शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

पकडीगुड्डम प्रकल्पाकडून शेतकऱ्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:05 PM

कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडालगत पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला. हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने शेकडो शेतकºयांना पुरेसे पाणी मिळत नाही. मूबलक निधी, रिक्त पदे आणि नियोजनाच्या अभावामुळे सिंचनाची व्याप्ती वाढू शकली नाही. शेतीला पाणी मिळत नसल्याने शेकडो एकर जमीन कोरडवाहू आहे.

ठळक मुद्देकालव्याअभावी सिंचन घटलेशासन व लोकप्रतिनिधींची उदासिनताविविध कामे रखडली

जयंत जेनेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडालगत पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला. हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने शेकडो शेतकºयांना पुरेसे पाणी मिळत नाही. मूबलक निधी, रिक्त पदे आणि नियोजनाच्या अभावामुळे सिंचनाची व्याप्ती वाढू शकली नाही. शेतीला पाणी मिळत नसल्याने शेकडो एकर जमीन कोरडवाहू आहे.पकडीगुडुम धरणात प्रचंड गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक योग्यरित्या होत नाही. कालवे बुजल्याने शेतामध्ये पाणी पोहोचायला अडचणी निर्माण झाल्या. ेसिंचनाची सोय असूनही कालव्याअभावी शेकडो शेतकºयांना धरणातील पाण्याचा लाभ घेता येत नाही. काही शेतकºयांच्या जमिनी कोरडवाहू झाल्या आहेत. या प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी १९९० ला सोनुर्ली येथे प्रकल्प कार्यालय व कर्मचारी वसाहत तयार केली गेली. मात्र प्रकल्पाच्या निर्मितीपासूनच ही वसाहत ओस पडली आहे. वसाहतीचे दारे, खिडक्या चोरट्यांनी लंपास केली. संबंधित अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष असल्याने कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली वसाहत सध्या बेवारस आहे. सिंचन प्रकल्पाची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी वनसडी किंवा कोरपना येथे कार्यालय उभारणे गरजेचे होते. पण, प्रकल्पासून २० किमी अंतरावरील गडचांदूर येथे कार्यालय उभारण्यात आले. या प्रकल्पाकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही, अशी स्थिती झाली. अमलनाला व पकडीगुड्डम प्रकल्पामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येवू शकते. परंतु, नियोजन व निधीची तरतूदीकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांचा अपेक्षाभंग झाला आहे. प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाºया पाटबंधारे विभागात कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेवून शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. सिंचन प्रकल्पाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण केल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते. लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळा करून आहे.शेकडो एकर जमीन कोरडवाहूकोरपना तालुक्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संंख्या सर्वाधिक आहे. कापूस व सोयाबिनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, ही शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेतल्यास शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येवू शकते. या प्रकल्पाचा अनेक शेतकºयांना लाभ मिळत आहे. पण, सिंचनाखालील जमिनीचे हेक्टरी क्षेत्र अद्याप वाढले नाही. कोरडवाहू शेती करणाºया शेतकऱ्यांचे प्रमाण आजही चिंताजनक असल्याचे दिसून येते. त्यामुळे या धरणासाठी मूबलक निधी देवून शेतकऱ्यांची स्थिती बदलावी, अशी मागणी केली जात आहे.दीर्घकालीन नियोजनातूनच बदलणार स्थितीतालुक्याच्या भौगोलिक व कृषी स्थितीनुसार मोठ्या सिंचन प्रकल्पाची गरज होती. पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पामुळे अपेक्षा पूर्ण झाली. पाटबंधारे विभागाने प्रकल्पाकडे लक्ष दिल्याने बरीच कामे मार्गी लागली. पण, आर्थिक दुष्टचक्रात अडकलेल्या शेतीला बाहेर काढण्यासाठी सिंचनाची व्याप्ती वाढविण्याशिवाय पर्याय नाही. त्याकरिता उपलब्ध निधीचा योग्य वापर करून दीर्घकालीन नियोजन करणे काळाची गरज आहे. त्यातूनच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येईल.पाठपुराव्याशिवाय पर्याय नाहीपकडीगुड्डम हा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. तालुक्यातील पारंपरिक शेतीची सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे कृषीसिंचन साध्य होवू शकते. नगदी पिके घेणाºया शेतकऱ्यांची संख्या वाढण्यास मोठा वाव आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा, करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.