विषबाधेमुळे शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:34 IST2019-03-16T22:33:36+5:302019-03-16T22:34:07+5:30
राजुरा येथून सात किलोमीटर अंतरावर सातरी या गावातील तरुण शेतकऱ्याचा फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

विषबाधेमुळे शेतकऱ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
विहीरगाव : राजुरा येथून सात किलोमीटर अंतरावर सातरी या गावातील तरुण शेतकऱ्याचा फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
सचिन अशोक येरगुडे (२८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सचिन येरगुडे हे शुक्रवारी दुपारी शेतातील मिरची पिकांवर किटकनाशक फवारणी करीत होते. यादरम्यान त्यांना विषबाधा झाली. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला.