साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By Admin | Updated: November 8, 2015 01:13 IST2015-11-08T01:13:12+5:302015-11-08T01:13:12+5:30

शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा साप चावून मृत्यू झाला.

A farmer's death by biting a snake | साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

नवरगाव : शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा साप चावून मृत्यू झाला.
गिरगाव येथील शेतकरी रामचंद्र मोतीराम गीरडकर (६०) हे शेतातील पाणी पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या पायाला सापाने चावा घेतला. साप चावल्याचे लक्षात येताच कसेबसे ते घरी परत आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना लगेच उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, वर्धा येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आहेत.(वार्ताहर)

Web Title: A farmer's death by biting a snake