सामदा (बुज.) येथे शेतकरी दिवस
By Admin | Updated: January 3, 2017 00:45 IST2017-01-03T00:45:43+5:302017-01-03T00:45:43+5:30
सावली तालुक्यातील सामदा (बुज.) येथे सेमी आयडीबीआय बॅक शाखा व्याहाड (बुज.), सावली, व मारोडा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारला शेतकरी दिवस साजरा करण्यात आला.

सामदा (बुज.) येथे शेतकरी दिवस
नियमित कर्ज भरणाऱ्यांचा सत्कार : अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती
उपरी : सावली तालुक्यातील सामदा (बुज.) येथे सेमी आयडीबीआय बॅक शाखा व्याहाड (बुज.), सावली, व मारोडा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारला शेतकरी दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामदा (बुज.) येथील सरपंच उषा उईके तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विनोद भांडेकर, डॉ. विजय काळपांडे, नागपूरच बॅकेचे सहा. महाव्यवस्थापक सुरील पिलई, सावलीचे शाखा व्यवस्थापकचंदन लेंढे, व्याहाड (बुज.) चे शाखा व्यवस्थापक किरण भगत, मारोडाचे सहा. व्यवस्थापक सुनिल दळवी, कृषी सहायक रामगुंडे, संतोष तंगडपलीवार, दिवाकर भांडेकर, बुरले किसनराव चलाख आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बँक व्यवस्थापक म्हणाले, आयडीबीआय बँकेने गेल्या ५२ वर्षात राष्ट्रविकासात खूप मोठा वाटा असून नेटवर्कच्या माध्यमातून सुमारे दहा लाख शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियाना कृषी आणि कृषी सलग्न व्यवसायासाठी आवश्यक आर्थिक मदत करीत आहे.
यासाठी संपूर्ण शेतकरी बांधवानी बँकेशी जुळून, बँकेच्या सेवांचे लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच कृषी विभागाच्या संशोधकांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागातील विविध योजनांचा पुरेपूर लाभ घेवून शेती करण्याचे आवाहन केले.
यावेळी पिक कर्ज नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांचा बँकेमार्फत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रविण शंभरकर यांनी केले तर प्रास्ताविक व उपस्थिताचे आभार बँक व्यवस्थापक किरण भगत यांनी मानले. (वार्ताहर)