खरीपातील पीकविमा मोबदल्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:39+5:302021-01-13T05:12:39+5:30

कापूस, धानपिकासह सर्वच पिकांवर गतवर्षी कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकरी पुरते मेटाकुटीला ...

Farmers' cycle for kharif crop insurance compensation | खरीपातील पीकविमा मोबदल्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा

खरीपातील पीकविमा मोबदल्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा

कापूस, धानपिकासह सर्वच पिकांवर गतवर्षी कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकरी पुरते मेटाकुटीला आले आहेत. जिल्ह्यातील कोरपना, वरोरा, भद्रावती, राजुरा, मुल, सिंदेवाही तालुक्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला होता. त्यामुळे खरीपाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट आली. जिल्हा प्रशासनाने पिकांचे पंचनामे केले. मात्र पीक विमा कंपनीकडून मदत मिळाली नाही. त्यामुळे रबी हंगामातील पीक विमा योजनेत अनेक शेतकरी सहभागी झाले नाही. शासनाने जाहीर केलेली मदतही मिळाली नाही. रबी हंगामात सतत ढगाळ वातावरण असल्याने त्याचा फटका तूर व हरभऱ्यावर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा, तूर पिकांवर अळीने आक्रमण केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Farmers' cycle for kharif crop insurance compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.