लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा.) : कृषी विभागातर्फे येथील बाजार समितीमध्ये शेतकरी पंधरवडा सप्ताहाअंतर्गत आयोजित उन्नत शेती समृध्द शेतकरी कार्यक्रमाचा समारोप व तालुकास्तरीय कृषी मार्गदर्शन शिबिर पार पडले. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांची उपस्थिती होती.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर.जे. मनोहरे, भात संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या सहयोगी संचालक डॉ. उषा डोंगरवार, प्रकल्प समन्वयक डॉ. व्ही. जी. नागदेवते, डॉ. पी. पी. देशपांडे, उपविभागीय कृषी अधिकारी डी. एम. तपासकर, कृषी मंडळ अधिकारी एन. जी. आमले, तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. भारती, ज्येष्ठ नेते वसंत वारजूरकर, मोरेश्वर ठिकरे, तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, वासुदेव पाटील गोहणे, राजू देवतळे, प्रा. उमाजी हिरे, गणेश तर्वेकर, अवेश पठाण, सचिन आकुलवार, संतोष रडके, आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना असून त्या योजनांचा लाभ घेण्याची विनंती यावेळी शेतकºयांना करण्यात आला.
शेतकरी अभियानाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:06 IST
कृषी विभागातर्फे येथील बाजार समितीमध्ये शेतकरी पंधरवडा सप्ताहाअंतर्गत आयोजित उन्नत शेती समृध्द शेतकरी कार्यक्रमाचा समारोप व तालुकास्तरीय कृषी मार्गदर्शन शिबिर पार पडले. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांची उपस्थिती होती.
शेतकरी अभियानाचा समारोप
ठळक मुद्देशेतकऱ्यांची उपस्थिती : विविध योजनांची दिली माहिती