शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

साहेब, किमान नुकसानीचे पंचनामे तरी करा हो...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:27 IST

वर्धा नदीला दुसऱ्यांदा पूर : शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल

राजेश माहूरवार लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीला आलेल्या पुराने बळीराजा पुरता खचला आहे. शेतकऱ्याने पहिल्यांदा पेरणी केली. ती बिनकामाची ठरली. नव्या उमेदीने दुसऱ्यांदा पेरणी केली आणि पुराने संपूर्ण शेतीच पाण्याखाली आली. पदरमोड करून, खासगी कर्ज उसनवारी करून कसातरी मार्ग काढून शेतीत पुन्हा पिके लावली. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे पुन्हा पिके पाण्याखाली आली. यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे.

यापूर्वीच्या पूरस्थितीत अनेकांचे पंचनामे झाले. मोठ्या घोषणा झाल्या. पण मदत मात्र प्रत्यक्षात मिळाली नाही. आपल्या शेतीला जिवंत ठेवण्यासाठी पूर्ण जीव ओतणारा बळीराजा मात्र उपेक्षितच आहे. शेतकऱ्यांची फार मोठी अपेक्षाही नाही. किमान नुकसानीचे पंचनामे तरी करा हेच त्यांचे म्हणणे आहे. पण सरकार व काही अधिकारी याकडे लक्षच द्यायला तयार नाहीत. मतांचे राजकारण करण्यासाठी सर्वच पक्ष बहिणींना लाडकी म्हणताहेत. पण गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील एका शेतकरी बहिणीने आपली व्यथा जाहीर करीत या सरकारचा व प्रशासनाचा बुरखाच फाडला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील विद्या चौधरी या महिला शेतकऱ्याने आता टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. एका व्हिडीओतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत आमची शेतातली मिरची ही पाण्याखाली आली असून लाखोंचे नुकसान झाले. किमान नुकसानीचे पंचनामे व्हावे, अशी मागणी केली आहे. वर्धा नदीला पूर आल्याने तोहगाव कुडेसावलीसह, परसोडी, लाठी, अडेगाव, नंदवर्धन, पानोरा, आर्वी अशा अनेक नदीकाठी असणाऱ्या गावांना फटका बसला आहे.

पहिल्यांदा कापूस शेतात लावल्यानंतर धान पेरणी केल्यानंतर वर्धा नदीला मोठा पूर आला. त्याच्यामुळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले. नंतर काहींनी मिरचीची रोपे लावली होती आणि त्यांची लागवड आता आठवडाभरापूर्वी करण्यात आली. मात्र दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने ती मिरचीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे आता कंबरडेच मोडले आहे. यंदा शेती उद्ध्वस्त झाली असून एक रुपयाचेही पीक त्यांना घेता येणार नाही.

नुकसानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल तालुक्यातील अडेगाव येथील विद्या बालाजी चौधरी यांनी शेतीच्या नुकसानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत किमान प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावे, अन्यथा आत्महत्येचा पर्याय निवडावा लागेल, अशी भावना व्यक्त केली

"नुकसानग्रस्तांचे पंचनाम्याचे आदेश पथक बनवून त्यांना दिले आहेत. पूर ओसरल्यानंतर पंचनामे सुरू होतील. व्हिडीओमधील महिलेचे मत ऐकले. विद्या बालाजी चौधरी ही व्हिडीओतील महिला कुसुमबाई वसंत चौधरी यांची सून आहे. पूर आला होता, तेव्हा शेतात सर्व्हे केला आहे. "- शुभम बहाकर, तहसीलदार, गोंडपिपरी.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर