शेतकरी व शेतमजुरांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:56 IST2018-04-07T22:56:27+5:302018-04-07T22:56:27+5:30
उपविभागीय कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी व जबरानजोत धारकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका चिमूरच्या वतीने चिमुर उपविभागीय कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी व शेतमजुरांचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : उपविभागीय कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी व जबरानजोत धारकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका चिमूरच्या वतीने चिमुर उपविभागीय कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारीमार्फंत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
दिवसेंदिवस शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. उद्योगपतीना एन. पी. एच्या नावाखाली प्रचंड कर्जमुक्ती दिली जात आहे. मात्र शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती नाकारण्यात आली. शेतकºयांच्या पीकाला योग्य हमीभाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करण्यात यावी,.
जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जबरानज्योत धारकांवर लावण्यात आलेल्या तीन पिढयांची जाचक अट रद्द करावी, जबरानजोत धारकांच्या जमिनीचे व घराचे पट्टे त्वरीत वाटप करावे, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर व असंघटीत कामगारांना पाच हजार रुपये पेंशन देण्यात यावे, सरसकट कर्जमाफी करून सातबार कोरा करावा, फेटाळलेल्या दाव्यांची फेरचौकशी करावी, प्रत्येक गावाचे जंगलवरील सामूहिक वनहक्काचे दावे मंजूर करावे, शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव द्यावा, शहरातील अतिक्रमीत झोपडपट्टी धारकांना पट्टे देण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा चिमूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पार पडलेल्या किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य डॉ. महेश कोपुलवार, राज्य उपाध्यक्ष प्रा. नामदेव कन्नाके, अरूण वनकर, जिल्हा सचिव राजू गैनवार, नारायण जांभुळे यांनी संबोधित केले. त्यानंतर कॉ. विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी नामदेव नखाते, महेंद्र भिमटे, श्रीधर वाढई, संतोष दास, ममता भिमटे, उज्ज्वला बावणकर, मोरेश्वर डांगे, प्रकाश नागपुरे यांच्यासह परिसरातील शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.