‘आत्मा’ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण
By Admin | Updated: September 25, 2014 23:22 IST2014-09-25T23:22:08+5:302014-09-25T23:22:08+5:30
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत ‘धान पीक लागवड व तंत्रज्ञान’ या विषयावर येथील कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

‘आत्मा’ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण
सिंदेवाही : कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत ‘धान पीक लागवड व तंत्रज्ञान’ या विषयावर येथील कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी आर.एन. पठाण होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. डी.व्ही. दुर्गे, तसेच तज्ज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक एस.एन. पोतकिले, डॉ.एच. आर. सवई, डॉ.एम.व्ही. तोटावार, तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एच.एस. होले उपस्थित होते.
प्रास्ताविक आर.एन. पठाण यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश तसेच कृषी विभागातील विविध योजना याविषयी उपस्थिताना सांगितले. तद्नंतर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. डी.व्ही. दुर्गे यांनी बिजोत्पादन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. एस.एन. पोतकिले यांनी धान पीक लागवड व तंत्रज्ञान तसेच श्री पद्धतीने धान लागवड तंत्रज्ञान याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ.एच.आर. सवई यांनी किडीचे व्यवस्थापन व मित्र किड संवर्धन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.एम.व्ही. तोटावार यांनी धान पिकावरील रोगाविषयी माहिती व व्यवस्थापन या विषयी मार्गदशन केले. प्रगतशिल शेतकरी तथा भेंडाळा येथील शेतकरी मित्र श्यामसुंदर गोपाळा बन्सोड यांंनी नियोजन पद्धतीने धान लागवड करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा तसेच स्वत:च्या नियोजन पद्धतीने शेतीतील अनुभव उपस्थित शेतकऱ्यांसमोर कथन केले. या शिबिराचा शेतकऱ्यांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.संचालन ए.टी. मालखेडे कृषी सहाय्यक खांडला यांनी तर आभार जे.एम. पवार मंडळ कृषी अधिकारी नवरगाव यांनी केले. सदर कार्यक्रमाला सिंदेवाहीचे कृषी पर्यवेक्षक जे.जी. भिसे, कृषी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक जे.पी. झोडे, संघर्ष भडके, मरेगावच्या कृषी सहाय्यक दिपीका बोंकुलवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विशेष परिश्रम घेतले. या शिबिरात सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)