उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार
By Admin | Updated: February 4, 2017 00:41 IST2017-02-04T00:41:15+5:302017-02-04T00:41:15+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूला आयएसओ दर्जा मिळवून दिल्याबद्दल ...

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार
गडचांदूर : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूला आयएसओ दर्जा मिळवून दिल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर व त्यांच्या पत्नी संगिता खिरडकर यांचा कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक डोईफोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा विद्या कांबळे, ठाणेदार विनोद रोकडे, उपनिरीक्षक सूरज तेलगोटे आदी होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांचा प्रा. अशोक डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संगिता खिरडकर यांचा सत्कार नगराध्यक्षा विद्या कांबळे यांच्या करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी गडचांदूर ठाणेदार व नागरिकांच्या सहकार्यामुळेच कार्यालयाला आयएसओ दर्जा मिळाल्याचे सांगून गडचांदूर शहर शांतता प्रिय असल्याचे सांगितले.
पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाष पाथ्रीकर, प्रा. विजय आकनूरवार, प्रा. डॉ. शरद बेलोरकर, ठाणेदार विनोद रोकडे, नगराध्यक्ष विद्या कांबळे, प्रा. अशोक डोईफोडे यांनी खिरडकर गडचांदूर परिसरातील शाळा महाविद्यालय तथा ग्रामीण भागात अल्पावधीत लोकप्रिय झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला पत्रकार संघाची माजी अध्यक्ष रफीक शेख, कय्युम शेख, उपाध्यक्ष शशांक नामेवार, विनोद खंडाळे, प्रा. नानाजी घोटकर, पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उद्धव पुरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजूरकर यांनी केले. (वार्ताहर)
पोलीस ठाणे गडचांदूरच्या
वतीने सत्कार
उपविभाीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर व संगिता खिरडकर यांचा सत्कार पोलीस ठाणे गडचांदूरचे ठाणेदार विनोद रोकडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्षगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.