जिल्ह्यातून बारावीत प्रथम आलेल्या नेहा सिंगचा सत्कार

By Admin | Updated: May 31, 2015 02:02 IST2015-05-31T02:02:48+5:302015-05-31T02:02:48+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजची नेहा सुभाष सिंग

Farewell to Neha Singh, who was the first to get 12th in the district | जिल्ह्यातून बारावीत प्रथम आलेल्या नेहा सिंगचा सत्कार

जिल्ह्यातून बारावीत प्रथम आलेल्या नेहा सिंगचा सत्कार

चंद्रपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजची नेहा सुभाष सिंग ९५ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आली. या यशाबद्दल शनिवारी स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा एनएसयुआयच्या संयुक्त विद्यमाने नेहा सुभाष सिंग हिचा माजी खासदार नरेश पुुगलिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार स्वरूपात गणवेश, पुष्पगुच्छ व २५ हजार रुपयांचा धनादेश नरेश पुगलिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नेहाचे कौतूक करताना पुगलिया म्हणाले, नेहा ही गौरव पेपर मिलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराची मुलगी आहे. आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व स्वत:च्या परिश्रमाने तिने हे नेत्रदिपक यश मिळविले आहे. एका कामगाराने कौटुंबिक आर्थिक परिस्थिती आपल्या लेकरांना उच्च शिक्षित करणे सर्वसाधारण असताना ही बाब खरोखर इतरांना आदर्शभूत ठरावी अशीच भूषणावह आहे.
याप्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे गुरुजी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे महासचिव अशोक नागापुरे, कामगार नेते अजय मानवटकर, संजय हटवार, विश्वास जोगी, देवेंद्र बेले, एनएसयुआयचे दुर्गेश चौबे, यादव, अंकूर तिवारी, जुनैद शरीफ, पलास घाटे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Farewell to Neha Singh, who was the first to get 12th in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.