देविदास तेलमासरे यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST2021-06-03T04:20:20+5:302021-06-03T04:20:20+5:30

चंद्रपूर : जिल्हा दुग्ध व्यवसाय कार्यालयात ३४ वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यानिमित्त देविदास तेलमासरे यांना जिल्हा दुग्ध ...

Farewell to Devidas Telmasare | देविदास तेलमासरे यांना निरोप

देविदास तेलमासरे यांना निरोप

चंद्रपूर : जिल्हा दुग्ध व्यवसाय कार्यालयात ३४ वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यानिमित्त देविदास तेलमासरे यांना जिल्हा दुग्ध व्यवसाय कार्यालयातर्फे निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी शैलेश नवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मत्स्य विकास अधिकारी जांभुळे, सहाय्यक दूध विकास अधिकारी एन. बी. निंबाळकर, दूध शाळा व्यवस्थापक ढोले, अरुण मेश्राम, सहकार अधिकारी दिवसे, दुग्ध शाळेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शैलेश नवले यांनी तेलमासरे यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त होत असल्याचे दु:ख आहे. मात्र शासकीय सेवेत वयोमर्यादेची अट असल्यामुळे सेवानिवृत्त व्हावेच लागत असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

Web Title: Farewell to Devidas Telmasare