बल्लारपूर बसस्थानकावरील उंचीवरचे पंखे निरुपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:14+5:302021-01-13T05:13:14+5:30
फोटो बल्लारपूर : सुशोभित व प्रशस्त आणि प्रवाशांना आरामदायी व्यवस्था असलेल्या बल्लारपूर येथील बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीकरिता छतावर २४ पंखे ...

बल्लारपूर बसस्थानकावरील उंचीवरचे पंखे निरुपयोगी
फोटो
बल्लारपूर : सुशोभित व प्रशस्त आणि प्रवाशांना आरामदायी व्यवस्था असलेल्या बल्लारपूर येथील बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीकरिता छतावर २४ पंखे लावले आहेत. मात्र, त्यांची हवा खालीपर्यंत पोहोचू न शकल्याने ते निरुपयोगी ठरले आहेत.
स्थानकाच्या फलाटावर लागून प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे. बसची वाट बघत बसणाऱ्या प्रवाशांना हवा मिळावी, याकरिता छताला एकूण २४ पंखे लावले आहेत. मात्र, हे पंखे खूप उंचावर असल्यामुळे त्याची हवा खाली बसलेल्या प्रवाशांपर्यंत पोहोचत नाही. मात्र, ते चालू ठेवल्याने विद्युत खर्च होतो, पण त्याचा काहीएक उपयोग प्रवाशांना मिळत नाही. याकरिता या सर्वच पंख्यांची उंची कमी करून प्रवाशांना खेळती हवा मिळणार अशा उंचीला बसविणे आवश्यक आहे. तशी प्रवासी व नागरिकांची मागणी आहे.