कुटुंबीयांना शिवीगाळ व मारहाण, सहा जणांविरुध्द अॅक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:10+5:302021-07-05T04:18:10+5:30
शनिवारी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास आंबेडकर वाॅर्ड येथे राहणाऱ्या सहा लोकांनी शेजारच्या अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबातील आई-वडील आणि ...

कुटुंबीयांना शिवीगाळ व मारहाण, सहा जणांविरुध्द अॅक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
शनिवारी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास आंबेडकर वाॅर्ड येथे राहणाऱ्या सहा लोकांनी शेजारच्या अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबातील आई-वडील आणि आजारी भावाला जागेच्या जुन्या वादातून जातिवाचक शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून हॉकीस्टिक आणि विळ्याने मारहाण केली होती. यामध्ये फिर्यादी अल्पवयीन मुलगी, वडील विजय पाटील, आई सारिका पाटील व भाऊ सिद्धार्थ पाटील हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी शनिवारी रात्री १० वाजता पाटील कुटुंबीयांच्या तक्रारीवरून माजरी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द अप.क्र.१५३/२०२१ कलम भादंवि ३२४,१४३,१४७,१४८,१४९,४५२ व अनु. जाती/जमाती कायदा अॅक्ट्रॉसिटी ३(१), ३(२)/व्हीए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शनिवारी एका आरोपीला अटक करण्यात आली. बबलू उर्फ बलवंत रंगलाल सिंग (४२) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अन्य पाच आरोपी फरार आहे. त्यामध्ये कृष्णा ठाकूर व इतर चार महिलांचा समावेश आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे हे करीत आहे.