कुटुंबस्तर संवाद अभियान प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:30 IST2016-08-24T00:30:01+5:302016-08-24T00:30:01+5:30
गावागावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत आहे. रोगांचा समूळ नायनाट करायचा असल्यास प्रत्येकानी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेऊन जागृत राहिले पाहिजे.

कुटुंबस्तर संवाद अभियान प्रारंभ
संध्या गुरुनुले : स्वच्छतेतून रोगांचे निर्मूलन शक्य
मूल : गावागावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत आहे. रोगांचा समूळ नायनाट करायचा असल्यास प्रत्येकानी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेऊन जागृत राहिले पाहिजे. तेव्हाच आरोग्य सुरक्षित राखता येईल. आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी स्वच्छतेशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी केले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हास्तरीय कुटुंबस्तर संवाद अभियानाचा प्रारंभ मूल तालुक्यातील डोंगरगाव येथून करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी आपल्या भाषणातून दरवर्र्षीे १५ लाख रुग्ण अस्वच्छतेच्या सवयीमुळे दगावत असल्याचे सांगून त्यांनी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. याशिवाय संतांनी घालून दिलेल्या विचारातून गावाचा विकास करावा, असे त्यांनी आवाहन केले. तसेच अस्वच्छतेचा जादुई प्रयोग स्वत: सिंह यांनी करून दाखविली. या प्रयोगातून घाण आपल्या पोटात कशी जाते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहिते यांनी केले. मोहिते यांनी कुटुंबस्तर संवाद अभियानाविषयी प्रास्ताविकातून मांडण्यात आले.
कार्यक्रमात डोंगरगावचे सरपंच मुकेश गेडाम व गटविकास अधिकारी दिलीप पांढरवडे यांनीही मार्गदर्शन केले. गावात भव्य स्वच्छता रॅली, शौचालयाच्या कामाचे भूमीपूजन, शौचालयाचा शुभारंभ, गृहभेटी, स्वच्छता सभा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला स्वच्छ भारत मिशनचे आयईसी कृष्णकांत खानझोडे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, स्वच्छता तज्ञ तृशांत शेंडे, विस्तार अधिकारी जयेश रारूत, राजू परसावार, बीआरसी हर्षवर्धन गजभिये, सचिन येरमलवार, मूल तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, गावातील सर्व गावकरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)