बालिकेला जन्म देणाऱ्या कुटुंबास मिळणार आर्थिक मदत
By Admin | Updated: February 12, 2016 01:34 IST2016-02-12T01:34:56+5:302016-02-12T01:34:56+5:30
बालिकेला जन्म देणाऱ्या कुटुंबास मिळणार आर्थिक मदत

बालिकेला जन्म देणाऱ्या कुटुंबास मिळणार आर्थिक मदत
उपरी : सावली तालुक्यातील उपरी येथील ग्रामपंचायतीने आयोजित ग्रामसभेत गावातील रहिवासी कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीच्या नावे तीन हजार ३३३ रुपये बँकेत १८ वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट करण्याचा निर्णय सरपंच आशिष भनबत्तुलवार यांनी जाहीर केला. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी उपरी ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिलीच आहे.
देशात दिवसेंदिवस मुलीच्या जन्मदरात मोठ्या घट आहे. केंद्र सरकार याची दखल घेवून बेटी बचाओ, बेटी पढाओ हा उपक्रम हाती घेतला असुन या उपक्रमाला प्रत्येक राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर उपरी ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. ही योजना येत्या एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी ग्रामसभेत दिली. (वार्ताहर)