तालुक्यात बनावट दारूची तस्करी

By Admin | Updated: January 1, 2016 01:56 IST2016-01-01T01:56:07+5:302016-01-01T01:56:07+5:30

जिल्ह्यात दारूबंदी होऊन जवळपास दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी सिंदेवाही तालुक्यात अवैध दारूविक्रीला

Fake liquor smuggling in the taluka | तालुक्यात बनावट दारूची तस्करी

तालुक्यात बनावट दारूची तस्करी

सिंदेवाही : जिल्ह्यात दारूबंदी होऊन जवळपास दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी सिंदेवाही तालुक्यात अवैध दारूविक्रीला आळा घालण्यात पोलिसांना यश आले नाही. आता तर या परिसरात बनावट दारूची तस्करीही वाढल्याची माहिती आहे.
नागपूर, भंडारा, यवतमाळ या लगतच्या जिल्ह्यातून दारूची तस्करी रात्री केली जाते. अवैध दारूविक्रेते कमी अवधीत जास्त पैसा कमविण्याच्या मोहात स्वस्त दारूची तस्करी करुन जास्त भावाने विकत असतात. दारू विक्रेत्यांनी रासायनिक पदार्थापासून दारू तयार करुन तिची विक्री सुरू करण्याचा सपाटा सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली. इथेनॉल, स्पिरीटचा वापर करुन एका भंगाराकडून रिकाम्या बाटल्याची खरेदी करुन वापरली जाते. यामुळे दारू पिणाऱ्यांच्या जिवाला धोका होण्याची दाट शक्यता आहे. विषारी दारूमुळे अलिकडेच अनेकांचे जीव गेले असल्याची उदाहरणे डोळ्यासमोर आहे. त्यामुळे तालुक्यात असा प्रकार घडू नये, यासाठी पिणाऱ्यांनी सावध राहावे, असा पोलिसांनीसुद्धा वेळोवेळी सल्ला दिला आहे. शहरातील अनेक हॉटेलमध्ये सर्रास मद्यपींचा अड्डा बसतो. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Fake liquor smuggling in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.