फेसबुकची ओळख, पोलीस ठाण्याची हवा
By Admin | Updated: September 13, 2016 00:41 IST2016-09-13T00:41:17+5:302016-09-13T00:41:17+5:30
फेसबुक वरुन ओळख झाली अश्यातच ते दोघेही अधिक जवळ येत गेल्याने त्याचे प्रेमात रूपांतर झाल्याने ...

फेसबुकची ओळख, पोलीस ठाण्याची हवा
डाव अर्ध्यावर मोडला : युवतीच्या तक्रारीवरुन अटक
वरोरा : फेसबुक वरुन ओळख झाली अश्यातच ते दोघेही अधिक जवळ येत गेल्याने त्याचे प्रेमात रूपांतर झाल्याने मोबाईलवरुन प्रेमाच्या आणाभाका सुरू झाल्या. त्यामुळे दोघेही भेटीसाठी उत्सुक झाले तो चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शोधत आला. पहिल्या दिवशी प्रेयसीची भेट गाव अनोळखी असल्याने झाली नाही. त्यामुळे त्याने शहरातील लॉजमध्ये मुक्काम करीत दुसऱ्या दिवशी वरोरा शहरात प्रेयसीला भेटावयास गेला. तिथे तिच्या आप्तेष्ट उभे होते. त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याने त्याचा डाव अर्ध्यावरच मोडल्याने तो हताश झाला.
जातपात, धर्म, गावही माहीत नाही. अशातच फेसबुक वरुन दोघांमध्ये ओळख झाली दोघेही २१ वयातील तो पुणे जिल्ह्यातील तर ती चंद्रपूर जिल्ह्यातील फेसबुकवरील ओळखी दिवसागणीक वाढत गेली. त्याचे प्रेमात रूपांतर झाल्याने वाट्सअप व मोबाईलवर संभाषण सुरू होवून प्रेमाच्या हानाभाका सुरू झाल्याने दोघांनाही भेटीची उत्सुकता शिगेला गेली होती. प्रेयसी पुण्याला येण्याचे कारण शोधत होती. परंतु कारण सापडत नसल्याने तिने शब्द देवूनही ती पुण्यात पोहचू शकत नव्हती. त्यामुळे प्रियकर अस्वस्थ झाला अशातच प्रेयसीने त्याच्याशी संवाद बंद करून टाकल्याने प्रियकर व्यतीत झाला त्याने प्रेयसीला गळफास असलेल्या दोराची प्रतिकृती पाठवीत धमकी दिल्याची धारणा प्रेयसीस झाली.
त्याने आत्महत्या केल्यास आपण अडकले जावू अशी भिती प्रेयसीच्या मनात काहूर माजवू लागली. यावर मात करण्याकरिता तिने प्रियकराशी संभाषण सुरू ठेवले व त्याला भेटीचे निमंत्रण दिले. भेटीचे निमंत्रण मिळताच प्रियकराने थेट पुणे शहरातून वरोरा गाठले पहिल्या दिवशी भेट झाली नसल्याने त्याने लॉजमध्ये मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे प्रेयसीने प्रियकराला निर्जन स्थळी बोलाविले. प्रेयसी वाट बघत उभी असताना प्रियकर आला त्याचवेळी त्याच परिसरात दबा धरुन बसलेल्या युवतीच्या आप्तेष्टांनी त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन करीत युवतीने तक्रार केली.
हिसमुसल्या चेहऱ्याने प्रियकर वरोरा पोलीस स्टेशनच्या पायऱ्या पानावल्या डोळ्यानी चढू लागला व इथे फेसबुकवरील प्रेमाचा अंत झाला. (तालुका प्रतिनिधी)