पाणीपुरवठा कंपनीला ५३ लाख रूपये अतिरिक्त
By Admin | Updated: August 4, 2016 00:51 IST2016-08-04T00:51:32+5:302016-08-04T00:51:32+5:30
चंद्रपूर शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा खंडीत असतानाही उज्ज्वल कन्स्ट्रक्शन या पाणी पुरवठा कंपनीला मनपाने ५३ लाख रुपये अतिरिक्त दिले.

पाणीपुरवठा कंपनीला ५३ लाख रूपये अतिरिक्त
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश : विभागीय आयुक्त पाठवणार अहवाल
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा खंडीत असतानाही उज्ज्वल कन्स्ट्रक्शन या पाणी पुरवठा कंपनीला मनपाने ५३ लाख रुपये अतिरिक्त दिले. ही बाब समोर आली असून चार आठवड्यात या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे मनपातील पदाधिकारी आणि अधिकारी चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. २२ मे २०१६ पासून शहरातील सतत पाणीपुरवठा खंडीत होता. मात्र त्यानंतरही मनपाने कंपनीला ८० लााख रुपये दिल्याची बाब समोर आली आहे. चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे यांनी संदर्भात विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला. तेव्हा पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे काम पाहणाऱ्या या कंपनीला प्रत्यक्षात वसुलीपेक्षा ५३ लाख २४ हजार १३४ रुपये अतिरिक्त दिल्याचे समोर आले.
ही माहिती राज्य शासनाकडे तत्कालिन आयुक्त सुधीर शंभरकर यांनी पाठविली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चार आठवड्यात यासंदर्भातील अहवाल नागपूर विभागीय आयुक्तांना पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)