अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त भार

By Admin | Updated: February 12, 2017 00:32 IST2017-02-12T00:32:12+5:302017-02-12T00:32:12+5:30

चिमुकल्या मुलांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यापूर्वी त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम अंगणवाडी केंद्रामधून होते.

Extra loads on the anganwadi sevikas | अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त भार

अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त भार

सिंदेवाही : चिमुकल्या मुलांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यापूर्वी त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम अंगणवाडी केंद्रामधून होते. परंतु या मूळ उद्देशाला बाजूला सारून अंगणवाडीसेविकांवर अनेक कामे लादल्या जात आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांना ही सगळी कामे करावी लागत असल्यामुळे सेविकांत असंतोष वाढला आहे.
अंगणवाडीमध्ये लहान मुलांना बोलके करण्याकरिता व अक्षर ओळख करण्याकरिता आंगणवाडीसेविका काम करीत आहेत. अंगणवाडी सेविकेला दरमहा पाच हजार रुपये, मिनी अंगणवाडीसेविकेला २ हजार ४५० रुपये तर मदतनिसांना २ हजार ५०० रुपये मानधन दिले जात आहे. मात्र शिकवणीच्या कामाव्यतिरिक्त अंगणवाडीसेविकेला आरोग्य विभागाशी संबंधित सर्वेक्षणाची व अन्य कामे दिली जात आहेत. बाहेरगावी सभा, मेळाव्यासाठी वेळोवेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलांना सांभाळणे व त्यांना आवश्यक असणाऱ्या प्राथमिक शिक्षणाच्या कामात बाधा येत आहे. मुलांमधील कुपोषितपणा दूर करण्यास मोठी मदत होत आहे. मात्र सेविकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामे करावी लागत असल्याने कुपोषणमुक्तीच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.तुजपुंज्या मानधनावर सर्व कामे करून घेतली जात आहेत. हा एकप्रकारे शासनाचा दुजाभाव आहे. पिरिचराला टेबलवरची फाईल नेण्यासाठी १५ हजार रुपये मानधन मिळते. तर आंगणवाडीसेविका अल्प पैशात काम करते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Extra loads on the anganwadi sevikas