प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ
By Admin | Updated: August 7, 2016 00:36 IST2016-08-07T00:36:05+5:302016-08-07T00:36:05+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजनेला राज्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर केंद्र सरकारनेमहाराष्ट्रातील...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ
चंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेला राज्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर केंद्र सरकारनेमहाराष्ट्रातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी करून घेण्यासाठी १० आॅगस्टपर्यंत विमा काढता येणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या सहभागातून राज्यात पीक विमा योजना राबविण्यात येते. आता प्रधानमंत्री पीक विमा योजना देश पातळीवर सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ देताना शासनातर्फे विमा हप्त्यात मदत केली जाते. त्यानंतर शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास विमा रक्कम दिली जाते.
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी व फलोद्यान मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी घेतला आहे. त्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली. राज्य सरकारची शिफारस लक्षात घेऊन केंद्र शासनाने शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना १० आॅगस्टपर्यंत पीक विमा काढता येणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी व फलोत्पादन मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी दिनेश सावंत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)