सुदृढ शरीरासाठी व्यायामाची गरज - संजय धोटे
By Admin | Updated: June 26, 2016 00:48 IST2016-06-26T00:48:14+5:302016-06-26T00:48:14+5:30
धावपळीच्या जीवनात व्यायामाची नितांत गरज असून सुदृढ शरीरयष्टीसाठी नियमित व्यायाम केला पाहिजे,

सुदृढ शरीरासाठी व्यायामाची गरज - संजय धोटे
राजुरा : धावपळीच्या जीवनात व्यायामाची नितांत गरज असून सुदृढ शरीरयष्टीसाठी नियमित व्यायाम केला पाहिजे, असे प्रतिपादन व्यायाम शाळेच्या उद्घाटनप्रसंगी राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी केले.
तत्कालिन आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानिक विकास निधीमधून केलेल्या व्यायाम शाळेचा शुभारंभ झाला. व्यायामशाळेच्या वरच्या माळ्यावर महिलांसाठी व्यायाम शाळा बांधकाम करण्यासाठी १० लाखांचा निधी देण्याची घोषणा राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुभाष धोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, गटनेता स्वामी येरोलवार, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, प्रा. अनिल ठाकूरवार, विनायक देशमुख, अरुण मस्की, अॅड. अरुण धोटे, सुनील देशपांडे, दीनानाथ चिंचाळकर उपस्थित होते. प्रास्ताविक नगर परिषद राजुराचे उपाध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)