केंद्रावर पोहचण्यासाठी परीक्षार्थ्यांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:58+5:302021-03-18T04:27:58+5:30
----- बॉक्स शिष्यवृत्ती परीक्षा रद्द २१ मार्च रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, एमपीएससी व रेल्वे विभागाची परीक्षा ...

केंद्रावर पोहचण्यासाठी परीक्षार्थ्यांची कसरत
-----
बॉक्स
शिष्यवृत्ती परीक्षा रद्द
२१ मार्च रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, एमपीएससी व रेल्वे विभागाची परीक्षा असल्याने ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा ३७ जिल्हा केंद्रावरील ७६१ परीक्षा उपकेंद्रावर घेण्यात येणार होती. परंतु, आता ती परीक्षा रद्द करुन ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.
------
कोट
एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्याने अनेकांनी रेल्वेची तयारी सुरु केली होती. आता दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने कोणती परीक्षा द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण रेल्वेचीच परीक्षा देण्याचा विचार केला आहे.
-अमित दुधे, सावली
-----
वारंवार परीक्षा पुढे ढकलल्याने अनेक मुलांची मानसिक्ता बिघडली आहे. त्यातच नागपूर लॉकडाऊन असल्याने जाण्याची समस्या निर्माण झाली आहे. परंतु, परिक्षेवरच भविष्य असल्याने परीक्षेला जाणे गरजेचे आहे. परीक्षा देण्यासाठी येणार्या मुलांवर पोलिसांकडून कारवाई किंवा मारहाण करण्यात येवू नये.
-चेतन रामटेके, चंद्रपूर
--------