सेवा सहकारी संस्थेच्या मतदार यादीतून संचालकांना वगळले

By Admin | Updated: March 16, 2015 00:50 IST2015-03-16T00:50:09+5:302015-03-16T00:50:09+5:30

तालुक्यातील करंजी येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक जाहीर होताच निवडणूकीपूर्वी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतून विद्यमान संचालकासह अनेकांना वगळले वगळण्यात आले.

Exclude directors from voters' list of service co-operative organization | सेवा सहकारी संस्थेच्या मतदार यादीतून संचालकांना वगळले

सेवा सहकारी संस्थेच्या मतदार यादीतून संचालकांना वगळले

आक्सापूर: तालुक्यातील करंजी येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक जाहीर होताच निवडणूकीपूर्वी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतून विद्यमान संचालकासह अनेकांना वगळले वगळण्यात आले. या यादीत अपात्रांना संधी दिल्याचा आरोप जयपाल धोडरे यांनी केला असून यासंदर्भात त्यांनी सेवा सहकारी संस्था निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
संचालक जयपाल धोडरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, करंजी येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेचा निवडणूक कार्यक्रम नुकता जाहीर झाला. याकरिता चालू मतदार यादी तयार करताना व्यवस्थापक आलाम यांनी निष्काळजीपणाने मी स्वत: विद्यमान संचालक असतानाही माझे नाव वगळण्यात आल्याचा आरोप धोडरे यांनी केला आहे. तसेच या मतदार यादीत पाच वर्षांचा सभासदत्व कालावधी पूर्ण न झालेल्या अनेक व्यक्तींच्या नावाचा समावेश करण्यात आला असून उमेदवारी दाखल करण्याची ११ मार्चपर्यंत मुदत आहे. व्यवस्थापक आलाम यांच्या निष्काळजीपणामुळे आज मला निवडणूकीपासून वंचित रहावे लागल्याचेही धोडरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तद्वतच संचालक धोडरे यांच्यासह इतर ५० हून अधिक जुन्या मतदारांना या मतदार यादीतून वगळले असून व्यवस्थापकाच्या दुर्लक्षीत व हेकेखोर धोरणाचा फटका अनेक सभासदांना बसला आहे. तसेच व्यवस्थापक आलाम यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सभासदांना मासिक सभा भत्ता दिलेला नसून स्थानिक पातळीवरील काही लोकांना हाताशी धरुन मनमर्जीने मतदार यादीत घोळ करणे, सभासदांना मासिक भत्ता न देणे, संचालक मंडळाला, विश्वासात न घेता कामे करणे, असे अनेक प्रताप केल्याचेही धोडरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सदर गंभीर बाबीची आपण तालुका सेवा सहकारी निवडणूक अधिकारी यांचेकडे तक्रार केली असता, निवडणूक अधिकाऱ्याने तक्रार घेण्यासाठी दोन ते तीनवेळा टाळाटाळ केली. या गंभीर बाबींची आपण जिल्हा निबंधकांकडे तक्रार पाठविली असून वरिष्ठांनी न्याय न दिल्यास आपण न्यायालयाचा मार्ग पत्कारु असेही जयपाल धोडरे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Exclude directors from voters' list of service co-operative organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.