दोन घुबड मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:19+5:302021-02-05T07:36:19+5:30

या घुबडांचा मृत्यू बर्ड फ्लूचा तर प्रकार नाही नाही ना ,अशी चर्चा सुरू झाली आहे. नागभीड येथील मध्यवस्तीत दोन ...

Excitement over the discovery of two owls dead | दोन घुबड मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

दोन घुबड मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

या घुबडांचा मृत्यू बर्ड फ्लूचा तर प्रकार नाही नाही ना ,अशी चर्चा सुरू झाली आहे.

नागभीड येथील मध्यवस्तीत दोन घुबड मृतावस्थेत तर एक घुबड अत्यवस्थ अवस्थेत दिसून आल्यानंतर नागरिकांनी ही माहिती वनविभागाला दिली. लागलीच पावले उचलित वनविभागाने येथील पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. गिरिष गभणे यांना याबाबत अवगत करून पुढील कारवाईसाठी हे घुबड पशुवैद्यकीय विभागाच्या स्वाधीन केले. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. गिरिष गभणे यांनी या मृत घुबडाचे शवविच्छेदन करून अवयव पुढील तपासणीसाठी पुण्याच्या लॅबमध्ये पाठविले आहेत. या घुबडांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कोडे अहवाल पुण्याहून प्राप्त झाल्यानंतरच सुटणार आहे. या दोन घुबडांसोबतच आजारी अवस्थेत मिळालेला तिसरा घुबड औषधोपचाराने आता बरा झाला आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ .गिरिष गभणे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Excitement over the discovery of two owls dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.