उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव
By Admin | Updated: March 15, 2017 00:34 IST2017-03-15T00:34:10+5:302017-03-15T00:34:10+5:30
महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात केले होते.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव
महिला आर्थिक विकास महामंडळाचे आयोजन : चंद्रपुरात पार पडला कार्यक्रम
चंद्रपूर : महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात केले होते. या कार्यक्रमात ग्रामीण भागात बचत गट चळवळीमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, महाविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे आदी उपस्थित होते.
यावेळी ना अहीर यांनी, महिला बचत गटाच्या वस्तुंना बाजारपेठ उलपब्ध करुन देण्यासोबतच गटाच्या चांगल्या कामकाजासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून उगेमुगे यांनी तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण अंतर्गत जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या नोंदणीकृत १३ लोक संचालीत साधन केंद्राअंतर्गत २ हजार ४४९ महिला स्वयसहायता बचत गटांच्या ३० हजार २८१ महिलांचे संघटन झाल्याचे सांगितले. यावेळी महिला उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)
या महिलांचा गौरव
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला, लोक संचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष, सचिव, गाव प्रतिनिधी, इंटरनेट साथी, पशु साथी, कार्यालयीन व्यवस्थापक, लेखापाल सहयोगीनी यांचा फळाचे रोप, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला.