कर्नाटक एम्टा कंपनीद्वारे वैयक्तिक जागेवर उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST2021-01-22T04:26:08+5:302021-01-22T04:26:08+5:30
भद्रावती : कर्नाटक एम्टा कंपनीद्वारे सोमनाळा येथील वैयक्तिक शेतजमिनीवर उत्खनन चालवले आहे. हे अवैध उत्खनन थांबवून माझ्या जमिनीची नुकसान ...

कर्नाटक एम्टा कंपनीद्वारे वैयक्तिक जागेवर उत्खनन
भद्रावती : कर्नाटक एम्टा कंपनीद्वारे सोमनाळा येथील वैयक्तिक शेतजमिनीवर उत्खनन चालवले आहे. हे अवैध उत्खनन थांबवून माझ्या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी, अशा आशयाचे निवेदन भदू श्रावण कोरडे या शेतकऱ्याने तहसीलदाराकडे दिले आहे.
सोमनाळा येथील शेत सर्व्हे नंबर १२४ /१ या माझ्या शेतजमिनीला लागून कर्नाटक एम्टा या कंपनीचे बारूद गोडावून आहे. गोडाऊनच्या कंपाउंडला लागूनच असलेल्या माझ्या शेतात कंपनीने जेसीबीद्वारे तीन फूट खोल नालीचे उत्खनन सुरू केले आहे. याबाबत त्यांना काम थांबविण्यास सांगितले असता ही जागा आमच्याच मालकीची असल्याचे सांगितले. भदू श्रावण कोरडे यांनी यासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देऊन कंपनीद्वारे करीत असलेले काम थांबविण्याची मागणी केली आणि झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांना देण्यात आली आहे.