रोगनिदान शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:02+5:302021-02-05T07:36:02+5:30
भद्रावती : एकलव्य युवा संघटना भद्रावती व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या ...

रोगनिदान शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी
भद्रावती
: एकलव्य युवा संघटना भद्रावती व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सर्व रोगनिदान व उपचार शिबिर तथा रक्तगट तपासणीचे आयोजन स्थानिक लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
जवळपास ४०० रुग्णांनी रोगनिदान शिबिरात व अडीचशे जणांनी रक्तगट तपासणी करून घेतली.
याप्रसंगी शिबिराचे उद्घाटक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, लोक सेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, शिवसेना शहर प्रमुख नंदू पडाल, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, हर्षल शिंदे, अमित गुंडावार, राजू सारंगधर ,रुकसाना शेख, डॉ. निखिल धांडे, डॉ. संदीप कुत्तरमारे, डॉ. तडस व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन पायल शेडमाके, प्रास्ताविक प्रीतम देवतळे ,तर आभार सेजल बिश्वास यांनी मानले, यशस्वीतेसाठी वैभव मेश्राम, सौरभ पिसुदे, सेजल विश्वास, कोमल नागोसे व अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.