कर्णकर्कश हॉर्नमुळे सर्वांचेच कानावर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:51 IST2021-02-21T04:51:55+5:302021-02-21T04:51:55+5:30

दिवसेंदिवस नवनव्या दुचाकी बाजापेठेत येत आहेत. आपली दुचाकी फॅन्सी वाटावी म्हणून अनेकजण सायलेंसरमध्ये तसेच हाॅर्नमध्ये बदल करीत असतात. गर्दीचे ...

Everyone's hands on their ears because of the hoarse horn | कर्णकर्कश हॉर्नमुळे सर्वांचेच कानावर हात

कर्णकर्कश हॉर्नमुळे सर्वांचेच कानावर हात

दिवसेंदिवस नवनव्या दुचाकी बाजापेठेत येत आहेत. आपली दुचाकी फॅन्सी वाटावी म्हणून अनेकजण सायलेंसरमध्ये तसेच हाॅर्नमध्ये बदल करीत असतात.

गर्दीचे ठिकाण हेरून विनाकारण हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. तर बहुतेकजण विचित्र हाॅर्नच्या आवाजाने घाबरून वाहने थांबवत असल्याने दिसून येते. मात्र अशा वाहनचालकांवर पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कर्णकर्कश हॉर्न लावणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र कर्णकर्कश हॉर्नच्या दणदणाटाने चंद्रपूरकरांच्या चांगल्या कानठळ्या बसल्या आहेत.

बॉक्स

वर्षभरात केवळ १५९ जणांवर कारवाई

वाहनामध्ये तांत्रिक बदल करून वाहने चालविणाऱ्यांवर कलम १९८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतु, कर्णकर्कश हॉर्न व सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढणाऱ्याविरुद्ध जिल्ह्यात अत्यल्प कारवाई करण्यात येते. परिणामी वाहनचालक बिनदिक्कत कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी वर्षभरात सायलेेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या १५१ जणांवर कारवाई करून एक लाख ५२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या केवळ ८ जणांवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती आहे.

बॉक्स

घाबरविणारे हॉर्न लावणारे मोकाटच

अनेक वाहनचालकांनी आपल्या हॉर्नमध्ये तांत्रिक बदल करून बकरीचा आवाज काढणारे, लहान मुलांचा रडण्याचा आवाज, ॲम्ब्युलन्सचा आवाज, म्युझिकल हॉर्न, बुलेटमधून फटाके फोडल्याचा हाॅर्न बसवितात. गर्दीचे ठिकाण हेरून विनाकारण हाॅर्न वाजवत असतात. त्यामुळे इतरांना त्रास होतो. मात्र अशा वाहनचालकांवर पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नसल्याने बिनदिक्कतपणे ते हॉर्न वाजवत असतात.

Web Title: Everyone's hands on their ears because of the hoarse horn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.