अखेर वेकोलिच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST2021-03-10T04:28:40+5:302021-03-10T04:28:40+5:30

चंद्रपूर : वेकोलिमधील खासगी वाहन चालकाला किमान मानधन व पीएफ मिळावा, या मागण्यांसाठी माजरी क्षेत्रातील खासगी वाहन चालकांनी संप ...

Eventually, the strike of Vekoli employees was called off | अखेर वेकोलिच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे

अखेर वेकोलिच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे

चंद्रपूर : वेकोलिमधील खासगी वाहन चालकाला किमान मानधन व पीएफ मिळावा, या मागण्यांसाठी माजरी क्षेत्रातील खासगी वाहन चालकांनी संप पुकारला होता. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, वाहन मालक व वेकोलि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत वाहन चालकांना १२ हजार रुपये मानधन देण्यासह अन्य मागण्या मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला.

वेकोलिच्या माजरी क्षेत्रात माजरी, एकोणा, नागलोन, चारगाव, तेलवासा या कोळसा खाणी आहेत. या खाणीत ४७ खासगी वाहने अधिकाऱ्यांना ने-आण करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने लावण्यात आली आहेत. या वाहनांवर जवळपास शंभराच्या आसपास वाहन चालक आहेत. या वाहन चालकांना वेकोलि वेतन देते. मात्र वाहनचालकांचे वेतन, पीएफच्या रकमेवर मूळ वाहन मालकांचा डोळा होता. गेल्या काही वर्षांपासून वाहन चालकांना अत्यल्प मानधन देऊन त्यांची पिळवणूक सुरू होती. वाढत्या महागाईच्या काळात अत्यल्प वेतनावर काम करणे कठीण होत चालल्याने या वाहन चालकांनी मनसेचे राहुल बालमवार, जि.प. सदस्य प्रवीण सूर यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या होत्या. त्यांनी वाहन चालकांची ही अडचण वेकोलिच्या लक्षात आणून दिली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे शंभराच्या आसपास असलेल्या वाहन चालकांनी संप पुकारला होता. या संपाने वेकोलितील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. वाहने कार्यालयासमोर चालकांनी उभी ठेवल्याने त्यांच्या जाण्या-येण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. वाहन चालकांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने रविवारी बैठक बोलविण्यात आली. यात वेकोलिचे नायर, जोशी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, जि.प. सदस्य प्रवीण सूर, नागेश किन्नाके, कुलदीप चांदनखेडे, करण नायर, अनुप माथनकर, कवडू चोपणे, गणेश ठाकरे यांच्यासह वाहन मालक उपस्थित होते. या बैठकीत वाहन चालकांना १२ हजार वेतन व पीएफ व अन्य सुविधा देण्याबाबत वाहन मालकांनी होकार दर्शविताच संप मागे घेण्यात आला.

Web Title: Eventually, the strike of Vekoli employees was called off