अखेर ‘त्या’ जखमी वयोवृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:19 IST2021-07-02T04:19:58+5:302021-07-02T04:19:58+5:30

राजुरा तालुक्यातील तेलंगणा महाराष्ट्र राज्य सीमेवर लक्कडकोट गावाच्या काही अंतरावर असलेल्या घाटावरील महामार्गावर एक वयोवृद्ध जखमी अवस्थेत पडून ...

Eventually ‘that’ injured old man died | अखेर ‘त्या’ जखमी वयोवृद्धाचा मृत्यू

अखेर ‘त्या’ जखमी वयोवृद्धाचा मृत्यू

राजुरा तालुक्यातील तेलंगणा महाराष्ट्र राज्य सीमेवर लक्कडकोट गावाच्या काही अंतरावर असलेल्या घाटावरील महामार्गावर एक वयोवृद्ध जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास लक्कडकोट येथील युवकांना मिळताच माजी उपसरपंच मनोज मून, रूपेश लाडसे, प्रीतम काटकर, फिरोज खान, विजय मडावी हे घटनास्थळी पोहोचले. त्या जखमींची विचारपूस केली, लगेच राजुरा पोलिसांना माहिती दिली. तसेच रुग्णवाहिकेला फोन केला. गंभीर अवस्थेत असल्याने ओळख मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. त्याच दरम्यान राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. युवकांच्या सहकार्याने तत्काळ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु, रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. बापू कोंडय्या भोगारम (वय ६०), रा. सुकडपल्ली असे मृताचे नाव असल्याचे चौकशीत कळले.

Web Title: Eventually ‘that’ injured old man died