विश्व सामाजिक न्याय दिवसानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:36 IST2021-02-27T04:36:29+5:302021-02-27T04:36:29+5:30

वरोरा : तालुका विधी सेवा समिती व तालुका अधिवक्ता संघ वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा जिल्हा न्यायालयात विश्व सामाजिक ...

Event on the occasion of World Social Justice Day | विश्व सामाजिक न्याय दिवसानिमित्त कार्यक्रम

विश्व सामाजिक न्याय दिवसानिमित्त कार्यक्रम

वरोरा : तालुका विधी सेवा समिती व तालुका अधिवक्ता संघ वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा जिल्हा न्यायालयात विश्व सामाजिक न्याय दिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी जिल्हा न्यायाधीश डी. के. भेंडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जी. आर. तौर, सहदिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए.जे. फटाले, सहदिवानी न्यायाधीश एम. के. सोरते, सहायक सरकारी अभियोक्ता पक्षकार महिला व पुरुष पक्षकार तसेच न्यायालयातील कर्मचारी वृंद आणि अधिवक्ता संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अधिवक्ता पी. एम. कुडे, बी. एस. लोया यांनी सामाजिक न्याय या विषयावर सविस्तर माहिती दिली. जिल्हा न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी सामाजिक न्याय याविषयी माहिती दिली. प्रास्ताविक अधिवक्ता व्ही. एस. कुत्तरमारे यांनी केले. उपस्थितांचे आभार अधिवक्ता बी. एस. लोया यांनी मानले.

Web Title: Event on the occasion of World Social Justice Day