शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पावसातही ऐतिहासिक दीक्षाभूमीकडे वळली भीमपाखरांची पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपुरात धम्मदीक्षा दिली. या ऐतिहासिक सोहळ्याचे अनेक जण साक्षीदार आजही हयात आहेत. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे अनेक पिढ्यांना उजेडाची दिशा मिळाली, हा कृतज्ञभाव त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसून आला. कोरोनापूर्वी आयोजन समितीतर्फे  दोन दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी असायची. शहरात मिरवणूक काढल्या जायची.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माणूस म्हणून जगण्याचा अधिकार न देणारा धर्म नाकारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ रोजी समता व करुणेचा संदेश देणारा बौद्ध धर्म स्वीकारला. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी हजारो बौद्ध उपासक दरवर्षी चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर येऊन समतेचा जागर करतात. शनिवारी पाऊस सुरू असतानाही भीमपाखरांची पावले दीक्षाभूमीकडे वळली. धम्मक्रांतीचा यंदाचा ६५ वा प्रवर्तन दिन सोहळाही साधेपणात साजरा करण्यात आला. कोविड नियमांचे पालन करून बौद्ध आंबेडकरी अनुयायांनी ऊर्जाभूमीवर दाखल होऊन तथागत बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपुरात धम्मदीक्षा दिली. या ऐतिहासिक सोहळ्याचे अनेक जण साक्षीदार आजही हयात आहेत. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे अनेक पिढ्यांना उजेडाची दिशा मिळाली, हा कृतज्ञभाव त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसून आला. कोरोनापूर्वी आयोजन समितीतर्फे  दोन दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी असायची. शहरात मिरवणूक काढल्या जायची. या सोहळ्याला जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, तिबेट अशा जगभरातील भिक्षूंसह विद्वान बौद्ध प्रतिनिधींचा सहभाग असायचा. कोरोनामुळे दोन वर्षांपासून मुख्य सोहळ्यासह सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे पंचशील ध्वज, डोक्याला निळ्या पट्ट्या, पांढरा पोशाख, हातात मशाल व उरात भरलेला प्रचंड आत्मविश्वास घेऊन जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या आंबेडकर अनुयायांवर मर्यादा आल्या. कोविड नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त होता.

समता सैनिक दलाची मानवंदना धम्मक्रांतीच्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी समता सैनिक दलाच्या पथकाने दुपार दीड वाजेच्या सुमारास मानवंदना दिली.  सायंकाळी थोडी गर्दी दिसून आली. मात्र, बहुतांश नागरिक शहरातीलच असल्याचे दिसून आले. भीमसैनिकांचे जथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. 

पुस्तकांचे स्टॉल्स नसल्याची रुखरुख दरवर्षी दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात आलेल्या पुस्तकांच्या दुकानांवर आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी उसळायची. महापुरुषांच्या मूर्तींचे आणि क्रांतीचा संदेश देणाऱ्या भीमगीतांच्या सीडी स्टॉलही गर्दीने फुलून जायचा. कोरोनामुळे दोन वर्षांपासून हे सारेच प्रेरणादायी दृश्य दुर्मीळ झाले. कोरोना प्रतिबंधाचे पालन करून विचारांचे ठेवा असलेल्या पुस्तक विक्रीसाठी तरी प्रशासनाने परवानगी द्यायला हवी होती, अपेक्षा युवकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

 

टॅग्स :Dhammbhumiधम्मभूमी