वेकोलिला एक इंचही जमीन देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:23+5:30

माजरीची खाण क्रमांक ३ बंद करुन नागलोन यूजी टू ओसी सुरू केली. ही खाण सुरू झाल्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, नवीन खाणीसाठी माजरी येथे झालेल्या जनसुनावणीत नवीन प्रस्तावित खाण सुरू करताना सर्वांना जमिनीचा पूर्ण मोबादला व नोकरी द्यावी, नंतर जमिनीवर कोळसा उत्पादन करावे.

Even an inch land will not give to WCL | वेकोलिला एक इंचही जमीन देणार नाही

वेकोलिला एक इंचही जमीन देणार नाही

Next
ठळक मुद्देखाणीसाठी जनसुनावणी : शेतकऱ्यांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वेकोलि माजरीने नागलोन यूजी टू ओसी या खुल्या कोळसा खाणीला वाढीव म्हणून नवीन खाण प्रस्तावित केली आहे. यासाठी ४७९.१६ ते ७०६.२८ हेक्टर क्षेत्रात कोळसा उत्पादन क्षमता १.२० ते ३.७५ दशलक्ष टन प्रतिवर्ष उत्पादनाचा निर्णय घेतला आहे. यावर माजरी क्षेत्राच्या कुचना येथे जनसुनावणी सभा घेण्यात आली. त्यात माजरी परिसरातील पाटाळा, नागलोन, पळसगाव व राळेगावातील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला आहे. एक इंच जमीनही वेकोलिला देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
माजरीची खाण क्रमांक ३ बंद करुन नागलोन यूजी टू ओसी सुरू केली. ही खाण सुरू झाल्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, नवीन खाणीसाठी माजरी येथे झालेल्या जनसुनावणीत नवीन प्रस्तावित खाण सुरू करताना सर्वांना जमिनीचा पूर्ण मोबादला व नोकरी द्यावी, नंतर जमिनीवर कोळसा उत्पादन करावे. अन्यथा एक इंचसुद्धा जमीन देणार नाही, असा निर्धार शेतकºयांनी या जनसुनावणीत व्यक्त केला. यावेळी शासकीय अधिकारी व वेकोलि अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Even an inch land will not give to WCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.