लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही तीन डॉक्टर पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:44+5:302021-03-15T04:26:44+5:30

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर दाम्पत्यांनी २३ जानेवारी रोजी पहिला डोस घेतला. त्यानंतर २० फेब्रुवारीला दुसरा डोस घेतला. परंतु, काही ...

Even after taking two doses of the vaccine, three doctors are positive | लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही तीन डॉक्टर पॉझिटिव्ह

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही तीन डॉक्टर पॉझिटिव्ह

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर दाम्पत्यांनी २३ जानेवारी रोजी पहिला डोस घेतला. त्यानंतर २० फेब्रुवारीला दुसरा डोस घेतला. परंतु, काही दिवसातच त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली. त्यांनी तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सौम्य लक्षणे असल्याने ते गृह विलगीकरणात असून प्रकृती स्थिर आहे तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीसुद्धा कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतरही ते पॉझिटिव्ह आले. परंतु, त्यांनासुद्धा सौम्य लक्षणे आहेत. लस घेतल्यानंतरही ५७ दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी कोरोना होवू शकतो. परंतु, केवळ सौम्य लक्षणे असतात. तसेच धोका होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठांनी व ४५ वर्षावरील व्याधीग्रस्तांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी केले आहे.

Web Title: Even after taking two doses of the vaccine, three doctors are positive