३५ दिवसानंतरही डेरा आंदोलनावर तोडगा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST2021-03-16T04:29:13+5:302021-03-16T04:29:13+5:30

चंद्रपूर : कंत्राटी कामगारांचा सात महिन्यांपासून थकीत असलेला पगार तसेच इतर मागण्यांसाठी कोरोना योद्ध्यांनी जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात ...

Even after 35 days, there is no solution to the Dera agitation | ३५ दिवसानंतरही डेरा आंदोलनावर तोडगा नाही

३५ दिवसानंतरही डेरा आंदोलनावर तोडगा नाही

चंद्रपूर : कंत्राटी कामगारांचा सात महिन्यांपासून थकीत असलेला पगार तसेच इतर मागण्यांसाठी कोरोना योद्ध्यांनी जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात मागील ३५ दिवसांपासून डेरा आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला ३५ दिवस झाले असतानाही तोडगा निघाला नाही. दरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांना सोमवारी मंत्रालयात बोलावल्याची माहिती मिळाली आहे.

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये इंटरनॅशनल व अभिजित सिक्युरिटी एजन्सीला जुलै २०१९ मध्ये सफाई कामगार, कक्ष सेवक, सुरक्षा रक्षक इत्यादी मिळून ५०१ कामगार लावण्याचा कार्यादेश तत्कालीन अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांनी दिला होता. त्यामुळे पाचशेच्या जवळपास कंत्राटी कामगारांचा थकीत पगार देण्यात यावा, अशी मागणी जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी वारंवार पत्रव्यवहार केले. मात्र कंत्राटदारच नसल्याने पगार कोणाच्या मार्फत करायचा, हा प्रश्न निर्माण झाला. शासनाने थेट कामगारांच्या खात्यात पगार जमा करावा, अशी मागणी जन विकास कामगार संघातर्फे करण्यात आली आहे. मात्र शासन तसेच प्रशासनस्तरावर अद्यापही तोडगा निघाला नाही. दरम्यान, डाॅ. हुमणे यांनी शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप जनविकासचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे. या सर्व प्रकाराची वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी दखल घेतलेली असून अधिष्ठाता डॉ. हुमणे यांना मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Even after 35 days, there is no solution to the Dera agitation