२४ दिवसानंतरही वाघाचा बछडा आईविना पोरका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:55+5:30

वाघाचा बछडा ठणठणीत झाला आहे. त्यांच्या आईकडे सोडण्यासाठी वनविभागाने वाघिणीचा शोध घेतला असता केळझर सुशी परिसरात दोन वाघीण प्रत्येकी तीन बछडयासह आढळल्याने खरी आई कोण, असा प्रश्न वनविभागाला पडला आहे. तब्बल २४ दिवसानंतरही वाघाचा बछडा आईविना पोरका असल्याचे दिसूून येत आहे. मात्र वनविभागाला बछडयाची आई शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Even after 24 days, the tiger calf is orphaned without mother | २४ दिवसानंतरही वाघाचा बछडा आईविना पोरका

२४ दिवसानंतरही वाघाचा बछडा आईविना पोरका

googlenewsNext
ठळक मुद्देदोन वाघीण सापडल्याने संभ्रम : उपचारानंतर बछड्याची प्रकृती ठणठणीत

राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर क्षेत्रातील सुशी या गावात २४ एप्रिलला सकाळी अजय शेंडे यांच्या घराजवळील तणसाच्या ढिगाजवळ अंदाजे तीन साडेतीन महिन्यांचा वााघाचा बछडा मिळाला होता. सदर बछड्यावर चंंद्रपूरच्या प्राणी उपचार केंद्रात नेऊन उपचार करण्यात आले. सदर वाघाचा बछडा ठणठणीत झाला आहे. त्यांच्या आईकडे सोडण्यासाठी वनविभागाने वाघिणीचा शोध घेतला असता केळझर सुशी परिसरात दोन वाघीण प्रत्येकी तीन बछडयासह आढळल्याने खरी आई कोण, असा प्रश्न वनविभागाला पडला आहे. तब्बल २४ दिवसानंतरही वाघाचा बछडा आईविना पोरका असल्याचे दिसूून येत आहे. मात्र वनविभागाला बछडयाची आई शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
मूल तालुक्यातील सुशी या गावातील अजय शेंडे यांच्या घराजवळील तणसाच्या ढिगाऱ्यात २४ एप्रिल रोजी एक वाघाचे बछडे दिसून आले. याबाबतची माहिती होताच मूल येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे यांनी विभागीय वनाधिकारी सोनकुसरे व मूल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गदादे यांना घटनेची माहिती देऊन वनरक्षक मरस्कोले यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहाणी करुन विभागीय वनाधिकारी सोनकुसरे यांच्या परवानगीने वाघाच्या बछडयाला सुखरुप पकडून केळझर येथील नर्सरीत आणण्यात आले. यावेळी वनाधिकारी सोनकुसरे व अती शीघ्र कृती दलाचे बडकेलवार, बेग यांनी वाघाच्या बछड्याला प्राणी उपचार केंद्र चंद्रपूरला नेले. त्यावर योग्य ते उपचार करण्यात आल्यावर वाघाचा बछडा पुर्णपणे निरोगी असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर बछड्याला त्याच्या आईला शोधून तिच्याजवळ सोडण्याविषयी वनविभागाने प्रयत्न चालविला. विभागीय वनअधिकारी सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी राजूरकर व त्यांच्या सहकाºयाच्या मदतीने वाघिणीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी एक नव्हे तर दोन वाघीण असल्याचे दिसून आले.
सदर दोन्ही वाघिणीला तीन तीन बछडे असल्याचे दिसून आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी चक्रावून गेले. बछडयाची खरी आई कोणती, याबाबत चर्चा सुरू झाली. चर्चेनंतर एक विशिष्ट चाचणीद्वारे ओळख परेड केली जाणार आहे. यासाठी वनविभागाने प्रयत्न चालविला आहे. काही दिवसात खºया आईचा शोध लावल्यानंतर वाघाच्या बछडयाला मातेची ममता लाभणार आहे.

Web Title: Even after 24 days, the tiger calf is orphaned without mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ