जिवती येथे एमआयडीसी स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:25 IST2020-12-23T04:25:00+5:302020-12-23T04:25:00+5:30

--- राष्ट्रीय महामार्ग रखडलेलेच राजुरा : येथून आदिलाबाद व आसिफाबाद राष्ट्रीय महामार्ग अद्यापही रखडले आहे. त्यामुळे या मार्गाचे ...

Establish MIDC at Jivti | जिवती येथे एमआयडीसी स्थापन करा

जिवती येथे एमआयडीसी स्थापन करा

---

राष्ट्रीय महामार्ग रखडलेलेच

राजुरा : येथून आदिलाबाद व आसिफाबाद राष्ट्रीय महामार्ग अद्यापही रखडले आहे. त्यामुळे या मार्गाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. दोन्ही मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने व्यस्त आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांनी चौपदरीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

--

गोंडपिपरी येथे आगार नाही

गोंडपिपरी : येथे राज्य परिवहन महामंडळाने आगाराची निर्मिती करावी, अशी मागणी केली जात आहे. याठिकाणी आगाराची निर्मिती झाल्यास बसेसचे योग्य नियोजन करणे सोयीचे जाईल.

-

बल्लारपूर - सास्ती मार्गावर बस सेवा सुरू करा

बल्लारपूर : येथून सस्ती मार्गे राजुरा बस सेवा सुरू करावी, अशी मागणी परिसरातील नागरिककडून केली जात आहे. ही बस सेवा सुरु झाल्यास परिसरातील वेकोलि वसाहती व नागरिकांना सोयीचे होईल.

अत्यल्प बससेवामुळे प्रवासी त्रस्त

पोंभुर्णा : मुल मार्गावर अत्यल्प बस फेरी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावर बसे सेवा वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Establish MIDC at Jivti