शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:26 PM

राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूरतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना चंद्रपूरच्या दौºयावर असताना गुरुवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात १८ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देओबीसी महासंघ : शरद पवार यांना मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूरतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना चंद्रपूरच्या दौºयावर असताना गुरुवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात १८ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात ओबीसी समाजाची जणगणना घोषित करून केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, मंडल आयोग, नाच्चीपण आयोग, स्वामिथान आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या, ओबीसींना लावण्यात आलेली क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी, भारत सरकार स्कॉलरशिप १०० टक्के देण्यात यावी, तहसील व जिल्हास्तरावर स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी युपीएससी व एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात यावे, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना क्रिमीलेअरच्या मर्यादित करण्यात यावी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात यावा, ओबीसी समाजाचे चंद्रपूर ११, गडचिरोली ६, यवतमाळ १४, नंदूरबार धुळे ठाणे, नाशिक व पालघर ९ टक्के या जिल्ह्यातील वर्ग तीन व चारच्या पदभरतीमध्ये सन १९९७ पासून कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, ओबीसी समाजाचा अ‍ॅट्रोसिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा, तहसील न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व न्यायीक स्तरावर ओबीसींना आरक्षण लागू करण्यात याव, ओबीसी शेतकºयांसाठी वनहक्क पट्ट्यासाठी लावलेली तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी, ओबीसी समाजासाठी लोकसभा व विधानसभासाठी स्वतंत्र मतदार संघ स्थापन करण्यात यावा, खासगीकरण बंद करण्यात यावे, सरकारी कार्यालयातील ओबीसी संवर्गातील रिक्त पदे भरण्यात यावे, ओबीसी शेतकºयांना १०० टक्के सवलतीवर योजना सुरू कराव्यात, ओबीसी शेतकरी, शेतमजूरांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव फंड, प्रा. रवी वरारकर, बाळकृष्ण भगत, प्रवीण चवरे, रवींद्र टोंगे उपस्थित होते.