सीपेडच्या चंद्रपूर केंद्रात घडत आहेत उद्योजक

By Admin | Updated: May 15, 2016 00:37 IST2016-05-15T00:37:32+5:302016-05-15T00:37:32+5:30

सेंट्रल इन्स्टिट्युट आॅफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीपेड) अअंतर्गत चंद्रपुरात सुरू असलेल्या ....

The entrepreneurs are doing the same at Chandrapur Center in Sideped | सीपेडच्या चंद्रपूर केंद्रात घडत आहेत उद्योजक

सीपेडच्या चंद्रपूर केंद्रात घडत आहेत उद्योजक

प्लास्टिक उद्योगातून रोजगार : ८० प्रशिक्षकांची पहिली बॅच
चंद्रपूर : सेंट्रल इन्स्टिट्युट आॅफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीपेड) अअंतर्गत चंद्रपुरात सुरू असलेल्या केंद्रातून सध्या गावखेड्यातील तरूण उद्योजक आणि कौशल्यपात्र युवकांना घडविण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या कौशक्ल विकास कार्यक्रमांतर्गत दुर्गापूर वेकोलिच्या इमारतीमध्ये हे केंद्र सुरू असून जिल्ह्याभरातील ८० बेरोजगार युवक येथे प्रशिक्षित होत आहेत.
केंद्रीय रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी या प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आणि सुरू असलेल्या कामकाजाबद्दल माहिती जाणून घेतली. दुर्गापूर वेकोलिच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या या केंद्रातील पहिल्या बॅचमध्ये ८० प्रशिक्षार्थी सहभागी झाले आहेत. जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली ही बॅच जून महिन्यापर्यंत चालणार आहे. त्यात काही प्रकल्पग्रस्त असून बहुतेक युवक आणि युवती खेड्यातून आले आहेत. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ या वेळात दररोज चालणाऱ्या या प्रशिक्षणातून प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या बेसिक कोर्सचे धडे प्रात्यक्षिकासह दिले जात आहेत. त्यासाठी औरंगाबाद येथील सीपेडचे तज्ज्ञ प्रशिक्षक असून प्लास्टिकच्या दाण्यांपासून विविध उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण हे सर्वजण घेत आहेत.
या संर्भात माहिती देताना औरंगाबाद केंद्रातील प्रबंधक मिलिंद भरणे म्हणाले, बेरोजगारी अधिक असली तरी त्यांच्या रोजगारासाठी कौशल्याची गरज असते. या केंद्रातून त्यांच्यात कौशल्य निर्माण करण्याचे काम केले जात आहे. प्रशिक्षणानंतर हे युवक कोणत्याही कंपनीत नोकरी करण्यासाठी पात्र ठरतील किंवा स्वत:चा व्यवसाय सुरु करू शकतील, एवढी पात्रता निर्मात केली जाणार आहे. जूनअखेर त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने कंपन्यांचे प्लेसमेंट ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)

देशभरात उघडणार १०० केंद्र - हंसराज अहीर
सीपेडचे देशभरात सध्या ४० केंद्र सुरू आहेत. ही संख्या १०० वर पोहचविण्याचा केंदीय रसायन आणि उर्वारक मंत्रालयाचा मानस असल्याची माहिती ना. हंसराज अहीर यांनी भेटीदरम्यान पत्रकारांना दिली. ते म्हणाले, राज्यात केवळ औरंगाबाद आणि त्यानंतर चंद्रपुरात असे दोनच ठिकाणी हे केंद्र सुरु आहेत. जळगावसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. देशात प्रत्येक विभागात एक केंद्र उभारण्याचा विचार मंत्रालयाचा आहे. बंगळुरुनंतर चंद्रपुरात सुसज्ज आणि अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असून त्यासाठी १५ एकर जागेचा शोध सुरू आहे. प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय अथवा एमआयडीसीजवळ जागा शोधली जात आहे. ही जागा मिळताच कामाला सुरू वात होणार आहे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या कंपोस्ट डेपोतील वेस्ट मटेरियलमधून प्लास्टिक निर्मित केली जाणार आहे. त्यासाठी एक युनिट डेपोलगत उभारण्याच्या दृष्टीने आयुक्तांशी चर्चा झाली आहे. या सोबतच चंद्रपुरातील आयटीआयमध्येही प्रशिक्षण केंद्राचे एक युनिट उभारले जाणार आहे. चंद्रपूरच्या केंद्रासाठी ५१ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून केंद्र आणि राज्याने मिळून समान भार उचलावयाचा आहे. बरिक कोर्सनंतर डीप्लोमा कोर्स भविष्यात येथून सुरू होती, त्याचा लाभ उद्योगांना बळकटी येण्यासाठी आणि स्थानिक बेरोजगारांना हमखास रोजगारासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: The entrepreneurs are doing the same at Chandrapur Center in Sideped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.