सक्षमपणे कामकाज करून गावाचा लौकिक वाढवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST2021-02-21T04:52:04+5:302021-02-21T04:52:04+5:30

मूल : गावाने मोठ्या विश्वासाने ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांच्यावर पाच वर्षे विश्वस्त म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी सक्षमपणे ग्रामपंचायतीचे ...

Enhance the reputation of the village by working competently | सक्षमपणे कामकाज करून गावाचा लौकिक वाढवावा

सक्षमपणे कामकाज करून गावाचा लौकिक वाढवावा

मूल : गावाने मोठ्या विश्वासाने ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांच्यावर पाच वर्षे विश्वस्त म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी सक्षमपणे ग्रामपंचायतीचे कामकाज करून गावाचा सर्वांगीण विकास आणि लौकिक वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य महेंद्र पांगळ यांनी केले.

मूल येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत यशदा पुणे यांच्याकडून प्रशिक्षकांची तीन दिवसीय प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा, जळगाव या जिल्ह्यातील प्रशिक्षक सहभागी झाले होते. या कार्यशाळेत प्रशिक्षकांना विविध कौशल्य पध्दती, ग्रामपंचायतीचे अधिकार, कर्तव्य, ग्रामविकास समित्या, सभा, ग्रामपंचायत उत्पन्नाची साधने, ई-पंचायत, लेखा संहिता-२०११, मानव विकास, विकास आराखडा, समस्या निराकरणाचे कौशल्य आदी विषयावर प्राचार्य महेंद्र पांगळ, प्राचार्य विजय जाधव, प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, अनिरुध्द वाळके, विशाल आक्केवार, सरिन पाल, मारोती वराटकर आदी तज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला यशदाच्या सहयोगी प्राध्यापिका प्रांजल शिंदे यांनी ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन केले.

Web Title: Enhance the reputation of the village by working competently