महापारेषणच्या स्टाफ सेटअपविरुद्ध अभियंते एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:50+5:302021-07-18T04:20:50+5:30

महापारेषणमध्ये स्टाफ सेटअप पद्धत लागू केल्याने सर्व विभागातील अभियंत्यांच्या कामावर विपरीत परिणाम होऊन कंपनीच्या प्रगतीत बाधा निर्माण होण्याचा संभव ...

Engineers rallied against Mahatrans staff setup | महापारेषणच्या स्टाफ सेटअपविरुद्ध अभियंते एकवटले

महापारेषणच्या स्टाफ सेटअपविरुद्ध अभियंते एकवटले

महापारेषणमध्ये स्टाफ सेटअप पद्धत लागू केल्याने सर्व विभागातील अभियंत्यांच्या कामावर विपरीत परिणाम होऊन कंपनीच्या प्रगतीत बाधा निर्माण होण्याचा संभव आहे. शिवाय, अभियंत्यांची पदोन्नतीही थांबणार आहे. महत्त्वाच्या पदांवर कमी अनुभव असलेल्यांची पदस्थापना झाल्याने गतवर्षी मुंबई ग्रीड फेल सारख्या घटना वाढू शकतात. संपूर्ण तंत्र संघटन असलेल्या महापारेषण कंपनीत पिरॅमिड संकल्पनेला वाव नाही. मात्र, मानव संसाधन विभाग चुकीच्या अट्टाहासाला पेटून नफ्यातील शासकीय कंपनीला संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप अभियंत्यांनी केला. ऊर्जानगर व बल्लारपूर कार्यालयासमोर संघटनेचे सहसचिव स्वप्नील सावे यांच्या नेतृत्वात द्वारसभा घेऊन अभियंत्यांनी स्टाफ सेटअप निर्णयाविरुद्ध घोषणाबाजी केली. महापारेषणने स्टाफ सेटअप रद्द केले नाही तर ३० जुलै २०२१ च्या मध्यरात्रीपासून तिन्ही वीज कंपनीतील अभियंता संप पुकारण्याचा इशारा सबॉर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशन दिला आहे.

Web Title: Engineers rallied against Mahatrans staff setup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.