पालिकेच्या सभेत अभियंत्यावर हल्लाबोल

By Admin | Updated: October 21, 2015 00:57 IST2015-10-21T00:57:17+5:302015-10-21T00:57:17+5:30

येथील नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.

Engineer in the meeting of the rally | पालिकेच्या सभेत अभियंत्यावर हल्लाबोल

पालिकेच्या सभेत अभियंत्यावर हल्लाबोल

ब्रह्मपुरी नगरपरिषद : सभागृहात खुर्च्या, पेपरवेट फेकले
ब्रह्मपुरी : येथील नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभेला सुरुवात होताच मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे या विषयावर प्रचंड गदारोळ घेऊन काही नगरसेवक अभियंता बंडावार यांच्यावर धावून जाऊन सभागृहातील खुर्च्या, पेपरवेट फेकून एकमेकांना खडेबोल सुनावले. त्यामुळे सभा चांगलीच गाजली.
नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टी व स्वतंत्र विकास आघाडीचे संयुक्तिक सत्ता स्थापन असली तरी विकास मुद्यावरुन अनेक खटके उडत असल्याचे आजवर घडले आहे. परंतु मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांच्या विरोधात सदस्यांनी कंबर कसल्याने सभेला गालबोट लागले.
यासंदर्भात नगराध्यक्ष रिता उराडे यांच्याशी संपर्क साधला, असता यास्मीन लाखानी यांना अपशब्द बोलल्याने त्यांनी प्रत्युत्तर दिले. सभेमधील वागणूक योग्य प्रकारची नव्हती.
काही महिला नगरसेविकांना अपशब्द बोलल्याचे सांगितले. या सभेत कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, सभागृहातील खुर्च्याची फेकाफेक करणे आदी प्रकार शहरविकासाठी योग्य नसल्याने या सभेतील सर्व ठराव बहुमताने पारीत झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एकूणच सत्ता स्थापनेवेळी विरोधी पक्ष अस्तित्वात नसतानाही या सभेच्या दरम्यान होणाऱ्या खडाजंगी प्रकारामुळे सत्तारुढ गट व विरोधी गट असे विभाजन झाले आहे. सभेला दोन्ही गटाचे नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Engineer in the meeting of the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.