मूलमधील चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 01:33 IST2016-03-11T01:33:03+5:302016-03-11T01:33:03+5:30

पोलीस बंदोबस्त : सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेची कार्यवाही

Encroachment on the Chandrapur-Gadchiroli highway was removed from the original | मूलमधील चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील अतिक्रमण हटविले

मूलमधील चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील अतिक्रमण हटविले

पोलीस बंदोबस्त : सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेची कार्यवाही
मूल : चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील फुटपाथवर दुकाने थाटुन अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा उगारण्यात आला आहे. करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेने गुरूवारपासून सुरू केली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यापुर्वीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटविले होते. मात्र वेळोवेळी प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे अतिक्रमण ‘जैसे थे’ झाले. फुटपाथवरील व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था नगरपरिषद प्रशासनाने करून द्यावी. जेणे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल, अशी मागणी आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असलेल्या चंद्रपूर - गडचिरोली महामार्ग नव्याने तयार करण्यात आला. या मार्गावरील फुटपाथवर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अतिक्रमण करून दुकाने थाटली. प्रत्येकांनी आपल्या जवळील हजारो रुपये खर्च करून व्यवसाय सुरू केला. पर्यायी दुकानांची व्यवस्था नसल्याने फुटपाथवर दुकाने थाटली. मात्र दुकान थाटल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दुकाने हटविण्याची कारवाई केल्याने शेकडो कुटुंब रस्त्यावर आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी अतिक्रमण हटविण्यात येते. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. वेळोवेळी लक्ष दिल्या गेल्यास अतिक्रमण होण्यास पायबंद घातला जाऊ शकतो. नगरपरिषदने या मार्गावर २२ लाख रुपये खर्च करून दुकान गाळे बांधले. बांधकामानंतर सदर जागा वनविभागाची असल्याचे माहीत झाल्याने लाखो रुपयांचे दुकान गाळे जीर्ण अवस्थेत आहे. विश्रामगृह मार्ग व पंचायत समितीसमोर दुकान गाळे तयार झाल्यास गरजुना दुकाने उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न कायमचा सुटू शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Encroachment on the Chandrapur-Gadchiroli highway was removed from the original

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.