महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाने कार्यालये रिकामी

By Admin | Updated: August 5, 2014 23:42 IST2014-08-05T23:42:13+5:302014-08-05T23:42:13+5:30

राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला तहसील तसेच नायब तहसीलदार संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यांत महसूल विभागाची यंत्रणा कोलमडली आहे. महसूल दिनापासून

Empty employees' offices are empty; | महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाने कार्यालये रिकामी

महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाने कार्यालये रिकामी

चंद्रपूर : राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला तहसील तसेच नायब तहसीलदार संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यांत महसूल विभागाची यंत्रणा कोलमडली आहे. महसूल दिनापासून सुरु झालेल्या या संपामुळे विविध लोकोपयोगी कामे पूर्णत: बंद पडले आहे. विशेष म्हणजे, संपाच्या दिवशी चिमूर येथील तहसीलदारांच्या कक्षापुढे चक्क कुत्रे आराम करत असल्याचे चित्रही बघायला मिळाले.
महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर परिणाम झाला आहे. १६ ते २० आॅगस्ट दरम्यान आचार संहिता लागण्याची चिन्हे दिसत असल्याने राजकीय पक्षांचेदौरे वाढत आहे. मात्र निवडणुकीची प्रशासकीय तयारी मागे पडलेली आहे. पीक सर्वेक्षण, नैसर्गिक आपत्ती निवारण व मदत, सूवर्ण जयंती राजस्व अभियान या सारख्या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. शालेय प्रमाणपत्र, शपथपत्राची कामे पूर्णत: खोळंबलेली असल्याने पालकवर्ग चिंतीत आहे.
जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये व जिल्हा कार्यालयसुद्धा ओस पडले आहे. या संपात जिल्हा व तालुकास्तरावर कर्मचारी सरकारविरोधी निदर्शने करीत आहे. आंदोलनांत संपूर्ण राज्यात सरासरी २८ हजार कर्मचारी संपावर असून जिल्ह्यातील ९५० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नायब तहसीलदार, अव्वल कारकून कनिष्ठ लिपीक, शिपाई व कोतवाल संवर्गाचा समावेश आहे.
महसूल कर्मचारी संघटनेने शासनाला दिलेल्या निवेदनानुुसार, नायब तहसीलदारांचा ग्रेड पे वाढविणे, कनिष्ठ लिपीकाचे पदनाम बदलविणे, कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देणे व वर्ग - ४ मधील कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास नोकरीत सामावून घेणे यासारख्या एकूण २६ मागण्यांचा समावेश आहे. ४ आॅगस्टपासून तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने केलेल्या मागण्यांच्या समर्थनाथ संपात उतरले आहेत. चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. त्यांनी याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात नायब तहसीलदार विलास वानखेडे यांच्यासह जिल्हा संघटनेचे राजू धांडे, शरद मसराम, सुनील तुंगिडवार, मनोज आकनुरवार, प्रविण चिडे आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Empty employees' offices are empty;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.