तीन हजार महिलांना कौशल्य विकासातून रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST2021-01-23T04:28:49+5:302021-01-23T04:28:49+5:30

ब्रह्मपुरी येथील एन.डी. गारमेंट येथे ॲडव्हान्स गारमेंट मेकिंग प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर कौशल्य विकास नागपूरचे आयुक्त ...

Employment of three thousand women through skill development | तीन हजार महिलांना कौशल्य विकासातून रोजगार

तीन हजार महिलांना कौशल्य विकासातून रोजगार

ब्रह्मपुरी येथील एन.डी. गारमेंट येथे ॲडव्हान्स गारमेंट मेकिंग प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर कौशल्य विकास नागपूरचे आयुक्त सुनील काळबांडे, नगराध्यक्ष रिता उराडे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त भय्याजी येरमे, एन.डी. गारमेंटचे संचालक नीलेश गुल्हाने, उद्योग महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड व्यासपीठावर विराजमान होते.

भविष्यात ‘मेड इन ब्रह्मपुरी’चे वस्त्र सर्व जगात जाऊन ब्रह्मपुरीकरांची मान अभिमानाने उंचावेल. हा प्रकल्प पाच एकरांत विस्तारित होईल. ब्रह्मपुरी विभागात दोन वर्षांत किमान दोन हजार तरुणांना रोजगाराचे नियोजन आहे. गोसेखुर्द प्रकल्पामुळे सिंचनाचा सर्वाधिक फायदा ब्रह्मपुरी क्षेत्राला होईल. शेती उत्पन्नातून उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. काही वर्षांत विविध उद्योग येणार असून, ब्रह्मपुरी उपविभाग उद्योगक्षेत्र म्हणून नावारूपास येईल, असेही ना. वडेट्टीवार म्हणाले. अशा प्रकारचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम विदर्भात सर्वांत पहिले ब्रह्मपुरी येथे सुरू करण्यात येत असल्याचे उपायुक्त सुनील काळबांडे यांनी म्हणाले. संचालक नीलेश गुल्हाने यांनी प्रास्ताविक केले. आभार कौशल्य विकासचे साहाय्य आयुक्त भय्याजी येरमे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला ब्रह्मपुरी येथील नगरसेवक, संबंधित अधिकारी, महिला व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Employment of three thousand women through skill development