लॉकडाऊनमध्ये कामगारांना रोजगार हमी योजनेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:01:16+5:30
बेरोजगार मजुरांना काम म्हणून शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेंतर्गत जॉब कार्डधारकांना कामाच्या मागणीनुसार काम देण्यात येते. कोरोना विषाणूमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंद बंद पडले. त्यामुळे कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली.

लॉकडाऊनमध्ये कामगारांना रोजगार हमी योजनेचा आधार
परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊन काळात बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात केली. ४८४ ग्रामपंचायतीतील २ हजार १८२ कामे सुरु झाली आहे. त्यातून जिल्ह्यातील ३३ हजार ५०९ मजुरांच्या हाताला कामे मिळाली.
बेरोजगार मजुरांना काम म्हणून शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेंतर्गत जॉब कार्डधारकांना कामाच्या मागणीनुसार काम देण्यात येते.
कोरोना विषाणूमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंद बंद पडले. त्यामुळे कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे जॉबकार्डधारकांकडून कामाची मागणी वाढली त्यानुसार जिल्ह्यातील ८५५ ग्रामपंचायतपैकी ४८४ ग्रामपंचायतमध्ये दोन हजार १८२ कामाला सुरुवात झाली आहे. विहिरींचे बांधकाम, तलाव खोलीकरण, शेततळे बांधकाम, गाळ उपसा, रस्त्यांचे बांधकाम अशी कामे सुरु करण्यात आली आहेत. या कामावर सुमारे ३३ हजार ५०९ कामगार काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामे रोजगार बंद असताना रोहयोची कामे मजुरांना दिलासा देणारी ठरली आहेत.
सोशल डिस्टन्सिंग पालन बंधनकारक
देशात कोरोना प्रादुर्भाव असल्याने शासनाने विविध प्रकारची नियमांवली तयार केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रोहयोची कामे सुरु झाली आहेत. त्या कामावर मजूरही कार्यरत आहेत. काम करताना कामगारांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच काम करताना मास्क बंधणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर व मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार कामाच्या मागणीचा विचार करुन कामे सुरु करण्यात आली आहेत. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. कामगारांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- किरणकुमार धनवाडे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रोहयो, चंद्रपूर.