निवडणूक पथकातील कर्मचारी मानधनापासून वंचित

By Admin | Updated: October 8, 2014 23:23 IST2014-10-08T23:23:49+5:302014-10-08T23:23:49+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे विविध पथक तयार करण्यात आले होते. या पथकाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या पथकातील कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार मानधन देवून

Employees in the election squad are deprived of the honor | निवडणूक पथकातील कर्मचारी मानधनापासून वंचित

निवडणूक पथकातील कर्मचारी मानधनापासून वंचित

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे विविध पथक तयार करण्यात आले होते. या पथकाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या पथकातील कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार मानधन देवून समाधान करण्यात आले. मात्र उर्वरित रक्कम अद्यापही देण्यात आली नाही.
ंचंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीदरम्यान आचरसंहितेचे पालन करण्यासाठी तसेच विविध कामांसाठी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. यात स्थिर निगरानी पथक, भरारी पथक, लेखा पथक, व्हिडीओ पथकांचा समावेश होता. या पथकामध्ये ३६ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने पूर्ण महिनाभर विविध ठिकाणी जाऊन काम केले. मात्र त्यांना केवळ १ हजार रुपये मानधन देऊन तोंडाला पाने पुसली. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासह ओव्हर टाईमचे बील प्रशासनाकडे सादर केले. परंतु विधानसभेची निवडणूक आली असतानाही लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे बील मंजूर करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, सध्या सुरु असलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी चेक पार्इंट सोयीचे नाहीत. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Employees in the election squad are deprived of the honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.