कर्मचाऱ्याशी असलेले प्रेमसंबंध प्राध्यापिकेच्या अंगलट

By Admin | Updated: May 9, 2016 00:53 IST2016-05-09T00:53:26+5:302016-05-09T00:53:26+5:30

नामांकित संस्थेद्वारा संचालित अनुदानित महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापिकेचे महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्यासोबत ‘सूत’ जुळले.

Employee love affair | कर्मचाऱ्याशी असलेले प्रेमसंबंध प्राध्यापिकेच्या अंगलट

कर्मचाऱ्याशी असलेले प्रेमसंबंध प्राध्यापिकेच्या अंगलट

वरोऱ्यातील घटना : हाणामारीतून बिंग फुटले
वरोरा: नामांकित संस्थेद्वारा संचालित अनुदानित महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापिकेचे महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्यासोबत ‘सूत’ जुळले. मात्र प्राध्यापिकेच्या मैत्रिणीचा पती प्राध्यापिकेच्या प्रियकराला मारण्याकरिता चाकू घेऊन धावला आणि या प्रेमप्रकरणाचे बिंग फुटले. कर्मचाऱ्याला अर्जीत रजेवर पाठविले तर प्राध्यापिकेला पूर्ण सुटी देऊन कर्मचारी व प्राध्यापिकेच्या प्रेमावर महाविद्यालयाने पडदा टाकून पे्रमप्रकरण हद्दपार केले आहे.
वरोरा तालुक्यातील एका नामांकित महाविद्यालयात एक विवाहित प्राध्यापिका मागील काही दिवसांपासून अस्थाई स्वरूपात कार्यरत होती. याच महाविद्यालयात अविवाहित असलेल्या स्थाई कर्मचाऱ्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही एका मंदिरात जाऊन विवाह केला. मागील कित्येक महिन्यांपासून दोघांचे प्रेमसंबंध सुरु होते. काही दिवसांपूर्वी प्राध्यापिका अचानक आजारी पडल्याने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करुन उपचार केल्यानंतर प्राध्यापिका आपल्या वरोरा शहरातील घरी गेली. कर्मचारी असलेला प्रियकर लगेच प्रेयसीच्या घरी पोहोचला. त्यावेळी प्राध्यापिकेच्या मैत्रिणीच्या पतीने हा प्रियकर असलेला कर्मचारी घरात दिसल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली. प्राध्यापिकेच्या मैत्रिणीचा पती हाणामारीनंतर चाकू घेऊन प्रियकर कर्मचाऱ्याला मारण्यासाठी धावल्याने प्रियकर कर्मचाऱ्याने थेट प्राचार्याचे घर गाठून आपली कैफियत मांडली. त्यामुळे प्राचार्य अवाक् झाले. त्यामध्ये प्रियकर असलेल्या कर्मचाऱ्यास अर्जीत रजा देऊन घरी पाठविले तर अस्थायी प्राध्यापिकेस कायमस्वरूपी घरी जाण्यास सांगून प्रकरणावर पडदा टाकला. परंतु या प्रेमप्रकरणाची खमंग चर्चा वरोरा शहरात सुरू आहे. यापूर्वीदेखील याच महाविद्यालयात एक प्रेमप्रकरण उघडकीस आले होते. (तालुका प्रतिनिधी )

Web Title: Employee love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.