मासळ परिसरातील उमेदवारांकडून सायंकाळच्या प्रचारावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:28+5:302021-01-14T04:23:28+5:30

तालुक्यात बहुतांश गावामध्ये सर्व पक्ष मिळून पॅनल निर्मितीला भर दिलेला आहे. स्थानिक राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तीला व विकासाला महत्व दिले ...

Emphasis on evening campaigning from candidates in the Masal area | मासळ परिसरातील उमेदवारांकडून सायंकाळच्या प्रचारावर भर

मासळ परिसरातील उमेदवारांकडून सायंकाळच्या प्रचारावर भर

तालुक्यात बहुतांश गावामध्ये सर्व पक्ष मिळून पॅनल निर्मितीला भर दिलेला आहे. स्थानिक राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तीला व विकासाला महत्व दिले जात आहे. ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत अनेक तरुणांना संधी दिल्यामुळे परिसरातील अनेक गावात तरुणांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे महत्व वाढताना दिसून येत आहे. प्रामुख्यांने प्रचारात गावाच्या विकासाच्या प्रश्नावर जास्त भर दिला जात आहे.

गावाची कुटुंब संख्या कमी असल्याने व उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नसल्याने गावाच्या विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. तालुक्यातील मासळ परिसरातील अनेक गावांची विकासाची तहान अजूनही भागलेली नाही. अनेक गावे फक्त रेकाॅर्डवर व नावापुरते हागणदारी मुक्त झालेली आहेत. शाळा,अंगणवाडीच्या इमारतीची दैनावस्था पहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार विकासकामांवर भर देताना दिसत आहे.

मत मागणे चिन्ह कोणते, याबाबत माहिती देण्यासाठी उमेदवार घरोघरी फिरत असून रात्रीचा खर्चदेखील वाढला आहे. त्यामुळे थंडी जास्त नसली तरी, निवडणुकीत जास्तच वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Emphasis on evening campaigning from candidates in the Masal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.